प्रति पंढरपूर शेंदुर्णी येथे शांतता कमिटीच्या बैठकीत घडले हिंदू, मुस्लिम एकतेचे दर्शन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०७/२०२२
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी या गावाची ओळख प्रति पंढरपूर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आहे. या गावात हिंदू, मुस्लिम बांधवांची धर्मस्थळे आहेत. शेंदुर्णी गावचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात हिंदू, मुस्लिम बांधव गुण्यागोविंदाने, एकतेने रहातात. विशेष म्हणजे दोघेही समाजातील सण, उत्सव साजरे करतांना सर्व समाजबांधव एकमेकांच्या सण, उत्सवात सहभागी होऊन एकत्रितपणे सण साजरे करुन एकमेकांच्या आनंदात भर घालतात. तसेच एकमेकांच्या सुखदुःखात धाऊन येतात अशी ही आदर्श शेंदुर्णी नगरी आहे.
याच नगरीत श्री. त्रिविक्रम महाराजांचे मंदिर असल्याने प्रति पंढरपूर म्हणून शेंदुर्णी गावाची महाराष्ट्रात ओळख तसेच आषाढी एकादशीला येथे भव्य यात्रा भरते या यात्रेत महाराष्ट्रभरातून भाविक, भक्त दर्शनासाठी येत असतात. म्हणून भाविक, भक्तांचा जणूकाही महासागर या यात्रेत दिसून योतो या यात्रा उत्सवात कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी व यात्रा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवण्यासाठी शेंदुर्णी येथील जेष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, श्री. त्रिविक्रम मंदिराचे संचालक मंडळ, हिंदू मुस्लिम, बांधव व पोलीस प्रशासनातर्फे एकत्र येत शांतता कमेटीची बैठक घेऊन त्या बैठकीत सर्वांच्या उपस्थितीत यात्रेचे आयोजन, नियोजन करण्यात येते.
यावर्षी आषाढी एकादशी व मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हे दोघह सण एकाच दिवशी आल्यामुळे पहूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मा. श्री. प्रतापराव इंगळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व शेंदुर्णी नगरीतील प्रमुख मान्यवर, समाजसेवक व हिंदू, मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत शांतता कमेटीची बैठक घेण्यात आली. या वर्षी आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोघंही सण एकाच दिवशी आल्यामुळे हिंदू, मुस्लिम बांधवांच्या भावना व समस्या जाणून घेत आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत कायदा सुव्यवस्था व शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासन, मंदिराचे संचालक मंडळ, गावातील जेष्ठ, श्रेष्ठ नागरीक, तरुण मंडळ व स्वयंसेवकांनी काय करावे याबाबत सविस्तर चर्चा होऊन यात्रा उत्सव व बकरी ईद सण शांततेत पार पाडण्यासाठी आवाहन करण्यात आले.
या बैठकीत मुस्लिम बांधवांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन आषाढी एकादशी व बकरी ईद हे सण एकाच दिवशी येत असल्याने जातीय सलोखा एकता टिकून रहावी म्हणून आम्ही या दिवशी बकरी ईदची कुर्बानी न करता फक्त नमाज पठण करणार असल्याचे सांगितले मुस्लिम बांधवांनी हा निर्णय जाहीर करताच शांतता कमेटीच्या बैठकीत टाळ्यांच्या कडकडाटात या निर्णयाचे स्वागत करण्यात येऊन पहूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मा. श्री. प्रतापराव इंगळे साहेब, शेंदुर्णी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, सदस्य, उपस्थित मान्यवर व सर्व हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवाचे आभार मानले.
पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रतापराव इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शांतता कमेटीच्या बैठकीत शेंदुर्णी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मा. साजिद पिंजारी, पोलीस उपनिरीक्षक मा. श्री. दिलीप पाटील, शेंदुर्णी नगरीचे प्रतिष्ठित व्यापारी भाजपाचे ज्येष्ठ नेते मा. श्री. गोविंदभाऊ अग्रवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते मा. श्री. सागरमल जैन, मा. श्री. शांताराम भाऊ गुजर, मा. श्री. पंडितराव जोहरे, मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक व नेते म्हणून ओळखले जाणारे जावा शेट, हाजी नबी शहा, शकुर शेख, शकील उस्ताद, पिंटू काझी, सुनील सिनकर, गणी तडवी, पोलीस हेड कॉन्स्टेबल मा. श्री. प्रशांत विणकर, गोपल गायकवाड, श्री त्रिविक्रम मंदिराचे सर्व संचालक मंडळ, शांतता कमेटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, तरुण मंडळ, समाज सेवक बहूसंख्य हिंदू, मुस्लिम बांधव व पत्रकार उपस्थित होते.