आदिवाल परिवाराचा ०८ नोंहेबर रोजी पाचोरा येथे धम्म दिक्षा घेण्याचा ऐतिहासिक व परीवर्तवादी निर्णय.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/१०/२०२२
पाचोरा शहरातील सर्वांचे परीचित असलेले आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत “हरीश प्रेमा आदिवाल” व त्यांचे चिरंजीव व बामसेफचे कार्यकर्ता *दिपक हरीष आदिवाल (एम.एस.ई.बी.) कर्मचारी यांच्या सह परीवारातील एकुण (२०) लोक यांनी “धम्मदीक्षा” घेण्याचा जाहीर निर्णय पाचोरा येथे घेतला आहे.
हा निर्णय ऐतिहासिक व परिवर्तनवादी समाजाच्या निर्मितीचे पहिलं आदर्श पाऊल ठरवत. संपूर्ण आंबेडकरी समाज व तत्सम पुरोगामी संघटनांनी आदिवाल परिवाराचे कौतुक केले व हे करुन धम्मदिक्षा सोहळव्याची समिती सुद्धा गठित करून घेतली आहे. जास्तीत जास्ती पंचक्रोशीतील सर्व आंबेडकरी समाज व पुरोगामी चळवळीच्या लोकं उपस्थित राहावेत. व सदर सोहळा हा कसा थाटात साजरी केला जावा या प्रमुख उद्देशाने समितीची निर्मीती करण्यात आलेली आहे.
सदर समितीत एक अध्यक्ष सहा उपाध्यक्ष एक संयोजक एक खजिनदार व सोहळा समितीकार्य सदस्य यांची निर्मिती करण्यात अाली आहे.या समितीचे १)अध्यक्ष आनंद भाऊ नवगिरे ४)उपाध्यक्ष आर.पी.बागुल साहेब,प्रकाश दादा बनसोडे, भाऊराव दादा पवार, गौतम भाऊ निकम ,संतोष दादा कदम, बी.आय.अाहिरे नाना १)संयोजक किशोर भाऊ डोंगरे १)खजिनदार राजेंद्र खर्चाने आप्पा,व सोहळाकार्य सदस्य सुनील दादा शिंदे, खालील दादा देशमुख, पृथ्वीराज भाऊ लोंढे, अविनाश भाऊ भालेराव ,नानासाहेब अशोक मोरे,अनिल भाऊ लोंढे, शंशिकांत मोरे ,यशवंत भाऊ सोनवणे, भैय्यासाहेब भालचंद्र ब्राह्मणे ,दीपक तायडे सर ,राजू भाऊ गायकवाड, संगीताताई साळुंखे,पोर्णिमा ताई सोनवणे व सर्व आंबेडकरी समाजातील लेखक,कवी,विचारवंत, पत्रकार,प्राध्यापक,शिक्षक, वकील,डॅाक्टर,नोकरदार इ. सामाजिक संघटना,पक्ष व कार्यकर्ते नेते महिला युवक व युवती व पुरोगामी चळवळीच्या पाचोरा शहरातील सर्व संघटना यांचा समावेश आहे.आशी माहिती धम्म दिक्षा सोहळा समितीचे संयोजक व प्रसिद्ध प्रमुख किशोर डोंगरे यांनी दिली आहे.