कुऱ्हाड खुर्द विविध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणूकीसाठी आज मतदान.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०४/२०२२
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणूकीसाठी आज दिनांक १७ एप्रिल २०२२ रविवार रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत सभासदांच्या हितासाठी व संस्थेच्या प्रतिष्ठेसाठी आम्ही निवडणूक लढवत असल्याचा फतवा घेत शेतकरी सहकार विकास पॅनल व सहकार परिवर्तन विकास पॅनल तर्फे सोसायटीच्या सभासदांना साकडे घातले असून आम्हाला जास्तीत जास्त मतदान करुन आपल्या सोसायटीच्या भरभराटीला हातभार लावून आपल्या सेवेची संधी द्यावी असे आवाहन केले जात आहे.
तसेच शेतकरी सहकार विकास पॅनल व सहकार परिवर्तन विकास पॅनलने आपापल्या परीने संस्थेच्या व सभासदांच्या हितासाठी जाहिरनामा काढून सभासदांच्या समोर ठेवून आम्ही जाहीरनाम्यातील सर्व अटी, शर्ती पूर्ण करु असे सांगून मते मिळवण्यासाठी सभासदांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
हि निवडणूक जरी सहकार क्षेत्रातील असली तरी या निवडणुकीचे गणित भविष्य येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हापरिषद निवडणूकीसाठी महत्वाचे ठरणार असल्याकारणाने शेतकरी सहकार विकास पॅनलच्या माध्यमातून कपबशी हे निवडणूक चिन्ह घेऊन भारतीय जनता पक्ष व सहकार परिवर्तन विकास पॅनलच्या माध्यमातून शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते एकत्रितपणे ट्रॅक्टर हे निवडणूक चिन्ह घेऊन समोरासमोर निवडणुकीच्या आखाड्यात उतरले असून आज मतदान होणार असून बघूया सोसायटीचे सभासद कुणाला मतदान करुन आपले व सोसायटीचे नेतृत्व करण्याची संधी देतात ते.