एका बाजूला उष्ण लहरीचा (हीटवेव) तडाखा, तर दुसरीकडे बेसुमार वृक्षतोड.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०३/२०२२
दिनांक १६ मार्च २०२२ बुधवार पर्यंत उष्ण लहरीचा (हीटवेव) तडाखा बसण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यानुसार प्रशासनाने नागरिकांना उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या काळात दुपारी बारा ते चार या दरम्यान शक्यतो घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत सगळीकडे वातावरणातील उष्णता दिवसेंदिवस वाढतच आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे माणसाच्या गरजा वाढत आहेत असे म्हणण्यापेक्षा लोकसंख्या वाढीमुळे एक स्पर्धा निर्माण झाली आहे. अशा स्पर्धेत फक्त स्वार्थ साधला जातो. निसर्गाचा आणि पर्यावरणाचा कोणीही विचार करतांंना आपण दिसून येत नाही. जेवढ्या औद्योगिक संस्था, शिक्षण संस्था, घरे, इमारती, रस्ते, मोठमोठे प्रकल्प, स्वयंचलित वाहनांची दररोज झपाट्याने वाढणारी संख्या, कारखानदारी व वाहनांच्या व्दारे हवेत पसरणारा कार्बन डाय-ऑक्साइड तसेच इतर समस्या मागील तीन दशकांत निर्माण झाल्या तेवढ्या यापूर्वी कधीही झाल्या नव्हत्या. त्या सर्वांसाठी लाकडाचा वापर हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे झालाच. साहजिकच त्यामुळे बेसुमार वृक्षतोड करण्यात आली.
झाडांचा आणि निसर्गाचा संबंध खूप जवळचा आहे. पृथ्वीवर जगण्यासाठी लागणारी हवा आणि पाणी हे झाडांवर अवलंबून आहे. जलचक्र पूर्ण होण्यासाठी जमिनीवर पाऊस पडावा लागतो. पाऊस पडण्यासाठी थंड आणि पर्यावरणयुक्त असा भूभाग आवश्यक असतो. त्यासाठी सदाहरित वृक्षांची गरज भासते. जेवढी वृक्षसंख्या जास्त तेवढा पाऊस जास्त पडतो. आता जर आपणच झाडे तोडली तर पाऊसाचे प्रमाण कमीच होईल.
झाडे देखील श्वसन क्रिया करत असतात ज्यामध्ये ऑक्सिजन बाहेर सोडून कार्बन डाय ऑक्साइड आत घेतात. माणसासाठी आणि इतर सजीवांना ऑक्सिजन आवश्यक असतो. तसेच सर्व सजीव कार्बन डाय ऑक्साइड बाहेर सोडतात. म्हणजेच झाडे आणि सजीव हे एकमेकांना प्राण प्रदान करतात असे म्हटले तरी काही चुकीचे ठरणार नाही. तसेच गाड्यांमधून आणि कारखान्यांमधून बाहेर पडणारे विषारी वायू हे देखील झाडेच शोषून घेतात.
वृक्षतोड जर झाली तर आपण आपलेच नुकसान करवून घेत आहोत. परिसरात झाडे नसल्याने उष्णता वाढत आहे. मानवी त्वचेसाठी आणि डोळ्यांसाठी ही उष्णता काही हितावह नाही. तसेच वायू प्रदूषणही झाल्याने आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. वृक्षतोड थांबवून परिसरात जर झाडांची संख्या वाढवली तर माणसाचे आरोग्य सुधारेल आणि दुष्काळ कधी येणार नाही.
झाडे आपली मुळे जमिनीत खोलवर नेतात. त्यांना पाण्याची गरज भासते. पाऊस पडल्यावर जमिनीत मुरणारे पाणी झाडांची मुळे आपोआप शोषून घेतात. त्यामुळे झाडांची वाढ होते. जमिनीचा कस नियंत्रित राखला जातो. मातीची धूप होत नाही. पण जर वृक्षतोड झाली तर मातीची धूप होऊन जमिनीचा कस संपुष्टात येईल. पर्यावरणाचा समतोल राखला जाणार नाही. प्राणी आणि पक्षी जीवन संपुष्टात येईल.
माणसाकडे विकासाच्या नावाखाली अनेक यंत्रे आहेत ज्याद्वारे कित्येक वर्षे जगलेला वृक्ष एका दिवसात नेस्तनाभुत केला जातो. जंगलच्या जंगल रिते केले जाते. तेथील प्राणी आणि पक्षी स्थलांतर करतात. त्यांची पाण्याची आणि खाण्याची समस्या आणखी एकदा डोके वर काढते. सर्वच्या सर्व वन्यजीवन विस्कळीत होते. एखादी नदी असेल, तिच्या शेजारील वृक्ष जर तोडले तर ती नदी उन्हाळ्यात सुकून जाते.
निसर्गचक्रात एक मोठा अडथळा वृक्षतोडीमुळे निर्माण झालेला आहे. पृथ्वीवर अचानक तापमान खूपच वाढले आहे. वाढत्या तापमानामुळे आणि प्रदूषणामुळे ओझोनचा थर लोप पावत आहे. अशा एक ना अनेक समस्या फक्त वृक्षतोडीशी निगडित आहेत. वृक्षतोड थांबवा. एक आनंदी पर्यावरण स्वतःसाठी आणि समाजासाठी निर्माण करा.
पर्यावरण आणि निसर्ग बचावासाठी अनेक सामाजिक आणि सरकारी संस्था कार्यरत आहेत. त्यांना सढळ हाताने आर्थिक मदत करा. गरज असल्यास श्रमदान करा. वृक्षतोड विरोधात मोहीम राबवा. असंख्य झाडे लावा, त्यांना जगवा. तेव्हाच एक मानवजातीचे उज्ज्वल भविष्य पुढच्या पिढ्यांसाठी आपण निर्माण करू शकतो.
जंगल तोडीचे कारणे
१) औद्योगिकीकरण
औद्योगिकीकरण हे जगभरातील जंगलतोडी मागचे मुख्य कारणांमध्ये एक आहे. जेव्हा पासून मानवाचे पृथ्वीवर अस्तित्व निर्माण झाले आहे तेव्हापासून ते आजपर्यंत मानव आणि खूप मोठा विकास केला आहे कधी विकासासाठी जेव्हा जमिनीचे गरज पडते तेव्हा जंगलाचा भाग तोडून त्या जमिनीवर इमारती उभारणे/ घर बांधणे/ उद्योग उभा करणे अशा वेगवेगळ्या कारणासाठी वापर केला जातो.
२) इंधन
जेव्हा लोकांना जंगलाच्या या ठिकाणी इंधन असल्याचे समजते तेव्हा ते पूर्ण जंगलाला तोडून टाकून त्या ठिकाणी इंधन शोधतात. जेव्हा लोकांना लाकडांची गरज पडते त्यामध्ये स्वयंपाक करण्यासाठी तेव्हा ती जंगलाची तोड करतात.
३) मूल्यवान वस्तू शोधणे.
जेव्हा लोकांना समजते, जंगलाच्या ठिकाणी मूल्यवान वस्तू आहे उदाहरणार्थ हिरा तेव्हा जंगलाची तोड करून त्या ठिकाणी मूल्यवान वस्तू शोधल्या जातात. अशी घटना मध्यप्रदेश येथे झाल्या आहेत.
जंगल तोडीचे दुष्परिणाम काय आहेत ?
मानव जंगलाची तोड करून, त्या जमिनीचा वापर वेगवेगळ्या कारणासाठी करतो जंगलातील लाकडाचा वापर इंधनासाठी करतो. पण दुसर्या बाजूला जंगल तोडीमुळे पर्यावरण परिणाम होतात.
जंगल तोडीचे परिणाम
१) पाऊस कमी पडणे.
ज्या भागामध्ये सर्वात जास्त झाडांची/ वृक्षांची संख्या असते तेव्हा जंगल भाग सर्वात जास्त असतो त्या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो. आणि ज्या ठिकाणी सर्वात कमी जंगलाचा भाग आहे त्या ठिकाणी कमी पाऊस पडतो. आणि म्हणून ज्या भागातील जंगल तोडले जात आहे या शेत्रात पाऊस कमी होण्याचा धोका आहे.
२) वन्यप्राण्यांची वस्ती नष्ट होणे.
जिथे जंगल आहे तिथे वन्यप्राणी त्यामध्ये पक्षी असो किंवा जमिनीवरील प्राणी वरील प्राणी, जमिनीच्या आत राहणारे प्राणी अशा वेगवेगळ्या वन्यप्राण्यांची वस्ती / वन्यप्राण्यांचा राहण्याचे ठिकाण जंगल तोडल्यामुळे नष्ट होऊन जाते.
निष्कर्ष
जंगल तोड करण्यामागे कारण आहे आणि त्याचे पर्यावरणावर होतच राहतात. म्हणून आपण जंगल तोड थांबवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच बरोबर आपण वृक्षलागवड करून भविष्यात जंगलतोड कमी होण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. निसर्ग टिकला तरच शेती व्यवसाय टिकेल हे शेतकऱ्यांना कळत असल्यावर सुद्धा शेतकरीच अल्पशा फायद्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे विकत आहेत. म्हणजेच सगळ्यांना कळते पण वळत नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. व आपण वेळीच वृक्षतोडीला आळा घातला तर ठीक नाहीतर भविष्यात खूप अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
महत्वाचे
जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यात बेसुमार वृक्षतोड सुरू असून या वृक्षतोडी कडे वन विभाग मुद्दामून दुर्लक्ष करत असल्याने दररोज हजारो झाडांची कत्तल होतांंना दिसून येत आहे. तसेच वृक्षतोड झाल्यावर या लाकडांची वाहतूक दिवसाढवळ्या हमरस्त्यावरून केली जात आहे. म्हणजेच अधिकारी व लाकूड व्यापारी यांचे आर्थिक साटेलोटे असल्याचे सिद्ध होते. तसेच पाचोरा वनविभागाकडे काही वृक्ष प्रेमींनी वारंवार तक्रारी करून सुद्धा पाचोरा वनविभागाचे अधिकारी या तक्रारी करणाऱ्यांना दमदाटी करत असल्याचेही काही निसर्गप्रेमींनी सांगितले. तरी पाचोरा येथील वन विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
खालील छायाचित्र पाहिल्यावर पाचोरा तालुक्यात वीरप्पनच्या पिल्लावळीचा चाललेला नंगानाच आपल्या लक्षात येईलच.
बचावासाठी काय करावे याबाबत ठाण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले की, दुपारच्या वेळेस घराबाहेर पडणे टाळावे. तहान नसली तरी जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलके, पातळ व सुती कपडे वापरावेत. बाहेर जाताना सनग्लासेस, स्कार्फ, छन्त्री टोपी यांचा वापर करावा. प्रवासा दरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवावी, उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्याने डोके, चेहरा झाकावा अश्या मार्गदर्शक सूचना केल्या.