राष्ट्रवादी कॉग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त कोरोना योद्ध्यांचा प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मान.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०६/२०२१
पाचोरा येथे आज हुतात्मा स्मारक जवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या दिनानिमित्त पाचोरा शहर व तालुक्यातील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका या कोरोना योद्ध्यांचा प्रमाणात व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कोरोनाची लागण झाली होती तेव्हा कोरणा योद्ध्यांनी प्रत्येक कोरोना बाधिताचा जीव वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा दिल्यामुळे आज आपल्या तालुक्यातील परिस्थिती आटोक्यात आली असून जवळपास कोरोनावर मात करण्यात यश आले आहे. असे मत माजी आमदार मा.श्री. दिलीपभाऊ वाघ यांनी व्यक्त करत कोरोना योध्द्यांचे आभार मानत शाबासकी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समजसेवा आहे. असे सांगत तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटीबद्ध आहे असे आश्वासन दिले
याप्रसंगी मा.श्री.संजय वाघ, नितीन तावडे,अज़हर खान, विकास पाटील, विजय पाटील, रंजीत पाटील, अभिजीत पवार, सुदर्शन महाजन, पंकज गढरी, उमेश ऐरंडे, वासुदेव महाजन ए.बी.अहीरे,नान देवरे, भागवत महालपुरे.तसेच पाचोरा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ,पाचोरा ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ. अमित साळूंखे,डॉ. गवळी आरोग्य सेविका भारती पाटील,जिजाबाई वाडेकर,वनिता जाधव,दीपाली भावसार, भिलाबाई ढोले,आकाश ठाकूर पदाधिकारी व कार्यकर्ता आणि पत्रकार बंधु उपस्थित होते.