सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • शेंदुर्णी येथील संशयास्पद व्यवहारावरुन दि पाचोरा पीपल्स बॅंक निवडणुकीत सहकार पॅनल अडचणीत.

  • कुऱ्हाड खुर्द येथील हॉटेल तारांगणाचा धिंगाणा थांबला, परंतु हॉटेल मैत्रीचे काय ?

  • पिंपळगाव हरेश्वर पोलीसांचा पोलीस अधीक्षकांनी केला गौरव.

  • वाढदिवसानिमित्त लाडक्या बहिणीने भावाला दिली गाय भेट.

  • लोहारी बुद्रुक सरपंच व सरपंच पती यांच्या विरोधात महिला उपसरपंचांची तक्रार, चौकशी करुन कारवाईची केली मागणी.

पाचोरा तालुका.
Home›पाचोरा तालुका.›पदमवंशीय तेली समाज विकास मंडळातर्फे सुमारे ६०० कोरोना युद्धांचा सत्कार संपन्न.

पदमवंशीय तेली समाज विकास मंडळातर्फे सुमारे ६०० कोरोना युद्धांचा सत्कार संपन्न.

By Satyajeet News
February 21, 2022
422
0
Share:
Post Views: 199
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०२/२०२२

पदमवंशीय तेली समाज विकास मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे दिनांक २० फेब्रुवारी रविवार रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी कोरोना योद्ध्यांच्या सत्कार सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय डॉ.मा. श्री. शशिकांत मंगरुळे (उपजिल्हाधिकारी संगमनेर) यांच्या हस्ते करण्यात आले. व या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय डॉ.आर.बी.तेली. (वरिष्ठ समिती सदस्य तथा माजी वैद्यकीय अधिकारी) हे होते

गेल्या दोन वर्षांपासून कोरना महामारीमुळे प्रत्येक समाजाची खूप हानी झाली. मात्र या काळात अनेकांकडून माणुसकीचे दर्शन झाले. या काळात डॉक्टर, फार्मासिस्ट, नर्स, पोलीस इत्यादींकडून अत्यावश्यक सेवा पुरविण्यात आल्या. त्यामुळे या सर्व कोरोना काळातील योद्ध्यांचा सत्कार करणे हे समाजाचे कर्तव्य समजून महाराष्ट्र राज्य तेली समाज मंडळाकडून सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन संगमनेरचे उपजिल्हाधिकारी व समाजाचे भूषण डॉ शशिकांत मंगरुळे यांनी केले. दीपप्रज्वलन करून व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात सर्व कोरोना युद्धांचा सत्कार करून शिवजयंतीनिमित्त पिंपळगाव हरेश्वर महिला कमिटीने आयोजित केलेल्या सौंस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षीस वितरण करण्यात आले.

समाजातील अनेक दानशूर दात्यांनी बक्षीसे, दिनदर्शिका कार्यक्रमासाठी लागणारे साहित्य मंडप, साऊंड सिस्टिम, खुर्च्या, अन्नदान, तसेच पिंपळगाव हरेश्वर येथे होणाऱ्या समाजाच्या मंगल कार्यालयासाठी भरभरून आर्थिक योगदान दिले. अशा सर्वांचे सत्कार करण्यात आला. यामध्ये ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच अजय कडुबा तेली यांनी मंगल कार्यालयासाठी ५१ हजार रुपये श्री. भगवान ढाकरे एफ.आर.ओ. नागपूर यांनी पाण्याची टाकी आणि बोर व्यवस्था करून देण्याचे जाहीर केले. कार्यक्रमासाठी राधेश्याम इंदरचंद माहोर यांनी दहा हजार रुपये इतके योगदान दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र कमिटीचे सचिव राजेंद्र ठाकरे सर यांनी केले व सुरू असलेल्या उपक्रमांबाबत व मागील काळात राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांकडून मार्गदर्शन मिळावे व आपण सर्वांनी समाजासाठी भरभरून सरळ हाताने सहकार्य करावे असे मत मांडले.

त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी आपल्या भाषणात समाजातील सर्व बंधू-भगिनींना मार्गदर्शन केले. तसेच समाज संघटित होणे गरजेचा आहे व समाजात अनेक नवीन उपक्रम सुरू आहेत. तसेच अनेक उपक्रम सुरु करण्यात यावे असे मत व्यक्त केले. तसेच समाजातील विविध क्षेत्रात कोरना काळात आपण सर्वांनी मेहनत घेतली त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. विद्यमान महाराष्ट्र राज्य कमिटीचे अध्यक्ष डॉ. शांतीलालजी तेली व यांच्या सहकार्यांनी अनेक नवीन उपक्रमांना सुरुवात केली आहे. त्याबद्दल त्यांनी संपूर्ण सहकारी मित्रांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच समाजाची दिनदर्शिका काढल्याने सर्वांचे कौतुक केले. या कार्यक्रमात पाचोरा, जामनेर, धुळे, सोयगाव तालुक्यातून तालुक्यातील ३२ गावातील समाज बंधू व भगिनी उपस्थित होत्या. यात सुमारे ६०० कोरना युद्धांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य कमिटीचे सल्लागार व माजी अध्यक्ष डॉक्टर आर.बी.तेली. हे होते आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी समाजात सुरू असलेल्या नवनवीन उपक्रमांचे कौतुक केले तसेच पिंपळगाव हरेश्वर येथे होणाऱ्या तेली समाज मंगल कार्यालय साठी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन हे पिंपळगाव हरेश्वर येथील स्थानिक पुरुष व महिला कमिटी यांच्याकडे होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय भगवान राधाकिसन ठाकरे (डी.एफ.ओ. नागपूर) डॉ.आर.एन. झेलवार (वरिष्ठ कमिटी सदस्य / माजी अध्यक्ष), नामदेव माणिकचंद मंगरुळे (वरिष्ठ सल्लागार सदस्य), डॉ. विशाल विठ्ठल ढाकरे (एमडी मेडिसिन), सुभाष लक्ष्मण सरताळे (माजी कृषी अधिकारी नांदेड), भारत केसरीलाल पाचोळे (पीएसआय सोयगाव), गणेश ताराचंद झलवार (पीएसआय जालना), राजेश सुरजमल दसरे (आर.एफ.ओ.जळगाव), सुभाष यादव बिंदवाल (वरिष्ठ सल्लागार सदस्य तथा देशदूत पत्रकार), प्रदीप केशरलाल ढाकरे (माजी अध्यक्ष), रघुनाथ गुलाबचंद मंगरुळे (सुफलामसीड्स, जळगांव), डॉ. प्रशांत जगन्नाथ चौधरी (बाल रोग तज्ञ), अजय रूपचंद ठाकरे (पीएसआय पुणे) तसेच महाराष्ट्र पदमवांशिय तेली समाजाचे अध्यक्ष डॉ शांतीलालजी नैनाव, उपाध्यक्ष शिवा झलवार, सचिव राजेंद्र ठाकरे, सहसचिव राजेंद्र दिगंबर चौधरी, कार्याध्यक्ष प्रभुलाल रामलाल झरवाल, सहकार्यध्यक्ष प्रकाश नारायण दसरे, कोषाध्यक्ष दिपक माणिकचंद मंडावरे, सहकोषाध्यक्ष संजय झेरवाल, युवा अध्यक्ष संदीप मोतीलाल सरताळे, सहयुवा अध्यक्ष संदीप सुपडू ठाकरे तसेच सर्व सदस्य तथा महिला कमिटीच्या उपाध्यक्ष सौ अलका ईश्वरलाल लहीवाल उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी पिंपळगाव हरेश्वर येथील स्थानिक कमिटीचे धडाकेबाज युवा अध्यक्ष चंद्रकांत कशीनाथ माहोर , उपाध्यक्ष मिश्रीलाल झेरवाल, सचिव अजय नैनाव सर व सर्व सदस्य, महिला कमिटीच्या अध्यक्षा सौ. वंदना झेरवाल, उपाध्यक्षा सौ. तुळसा लक्ष्मण माहुरे, सचिव ज्योती कैलास नैनाव व सर्व सदस्य तथा पिंपळगाव हरेश्वर येथील समाज बांधव-भगिनी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जुगल किशोर ठाकरे, सुनिल परदेशी, माधव नगरे, राजू नगरे, संदीप मंडावरे, अजय नैनाव, प्रशांत नैनाव, अमोल झेरवाल सर गायत्री मॅडम यांनी नियोजन तसेच सूत्रसंचालन केले. तर संजय झेरवाल यांनी केले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

ज्येष्ठ शाहीर शिवाजीराव पाटील यांना जळगाव येथे ...

Next Article

पाचोरा ते जामनेर रस्त्यावर आरवे फाटा ते ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • पाचोरा तालुका.

    खरा इतिहास अभ्यासण्याची गरज : शिव व्याख्याते प्रदीप देसले.

    February 20, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    प्रा.आ.केंद्र लोहारा येथे श्रीमती रूपाली गजानन क्षीरसागर यांचे वाढदिवसानिमित्त रुग्णांना सॅनेटरी नॅपकिनचे मोफत वाटप,सुलक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समुहाचा ...

    July 26, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    अधिकाऱ्यांनो अंगातील मरगळ झटका, नाहीतर बसेल कारवाईचा फटका, आ. किशोर आप्पा पाटील यांनी सुनावले खडे बोल.

    January 18, 2025
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पाचोरा गॅंगवार प्रकरणी कोळी बांधवांचे पोलीस निरीक्षकांना निषेधाचे निवेदन.

    February 1, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    कितीही बातम्या छापून आल्या तरी काहीच होत नाही, प्रश्नचिन्ह निर्माण करणारे सरपंच पतीचे जाहीर वक्तव्य.

    June 13, 2025
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    गिरणा पंपिंग रस्त्यावर पत्रकार भुवनेश दुसाने यांच्या गाडीला अपघात, कामाच्या चौकशीची मागणी.

    September 10, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    ऐकावे ते नवलच, मामेभावाने केला १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार, सोशल मिडीयावर केला व्हिडीओ व्हायरल.

  • कृषी विषयक

    कापसाच्या घसरत्या दरास कारणीभूत, झारीतील शुक्राचार्य कोण ? संतोष पाटील.

  • Uncategorized

    जळगाव जिल्ह्यात अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात वाढले ! उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेत थेट वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला फोनवरून चांगलेच झापले !! अवैध धंदे बंद करण्याची दिली ताकीद.

दिनदर्शिका

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज