सत्यजित न्यूजला बातमी येताच, पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचा दुरध्वनी झाला बोलका.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०४/२०२२
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला असलेला दुरध्वनी संच मागील पंधरा दिवसापासून बंद होता. यामुळे सर्वसामान्य जनतेला पोलिस स्टेशनला व पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांना जनतेशी तसेच इतर कार्यालयात संपर्क साधता येत नव्हता ही बाब सत्यजित न्यूजच्या लक्षात येताच दिनांक ३० मार्च २०२२ बुधवार रोजी याबाबत आवाज उठवून “पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचा दुरध्वनी मागील पंधरा दिवसापासून बंद. दूरसंचार विभाग कुंभकर्ण झोपेत” या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित करून हा दुरध्वनी त्वरित सुरु करण्यात यावा अशी मागणी केली होती.
हे वृत्त प्रकाशित होताच कुंभकर्णी झोपेत असलेले बी. एस. एन. एल. चे अधिकारी व कर्मचारी खडबडून जागे झाले व त्यांनी दिनांक ३१ मार्च २०२२ गुरुवार रोजी लगेचच पिंपळगाव हरेश्वर येथे येऊन पिंपळगाव हरेश्वर येथील पोलीस स्टेशनचा बंद असलेला दूरध्वनी दुरुस्त करुन लगेच सुरू करून दिला.
दुरध्वनी सुरु झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेची अडचण दुर झाली असून पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनमध्ये कामकाज गतीमान होण्यासाठी येणारा अडथळा दुर झाला आहे.