पाचोरा ते जामनेर रस्त्यावर आरवे फाटा ते मालखेडा दरम्यान तोडी, पाणी करणारी टोळी सक्रिय.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०२/२०२२
पाचोरा ते जामनेर रस्त्यावर आरवे फाटा ते मालखेडा गावा दरम्यान रात्री, बेरात्री किंवा कधीकधी दिवसाढवळ्या कोणतेही अधिकार तसेच कोणतेही कारण नसतांना पाचत ते सात तरुण स्वयंचलित दुचाकीवरून गस्त घालण्याच्या बहाण्याने लग्न वऱ्हाडाच्या तसेच गुराढोरांच्या व इतर मालवाहतूक गाड्या अडवून त्यांना नको ते प्रश्न विचारत आम्ही पोलिस आहोत तर कधी आम्ही पत्रकार आहोत अशी बतावणी करत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनची तसेच वेगवेगळ्या वृत्तपत्रांची नावे सांगत व काही प्रतिष्ठित पत्रकार यांच्या नावाने धमकी देत वाहनचालकांकडून तोडी, पाणीच्या नावाखाली खंडणी वसूल केली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. या गैरप्रकारामुळे पोलिस व पत्रकारांची नहाकच बदनामी होत आहे.
या गैरप्रकारात या रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारक व वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोणतेही कारण नसतांंना या टोळक्याला पैसे द्यावे लागतात पैसे न दिल्यास हे टोळके हमरीतुमरीवर येते व नहाकच झंझट नको व वेळ जातो म्हणून वाहनधारकांना मजबुरीने पैसे द्यावे लागतात असेही काही वाहनधारकांनी आसपासच्या गावातील सुज्ञ नागरिकांजवळ सांगितले तरी या गैरप्रकारात बद्दल संबंधित पोलीस स्टेशन तसेच रात्रीची गस्त घालणारे पोलिसांनी पाळत ठेवून या तोतया पोलिसांना व पत्रकारांना पकडून कठोरात कठोर शासन करावे अशी मागणी वाहनधारकांकडून तसेच आरवे, लोहारी, वरखेडी, अंबे वडगाव, मालखेडा गावातील ग्रामस्थांनी केली आहे. कारण या घटनांमुळे आमच्या गावाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असल्याचे सांगितले.
विषेश~ या तोतया टोळक्यांनी या रस्त्यावर त्यांचे खबरे ठेवलेले असून हे खबरे येणाऱ्या, जाणाऱ्या वाहनांची माहिती काढून संबधितांना भ्रमणध्वनीवर कळवतात व हे टपून बसलेले टोळके आरवे फाटा ते मालखेडा गावादरम्यान वाहनधारकांना लुटतात असे खात्रीलायक समजते.