जिल्हापरिषद प्राथमिक शाळा म्हसास येथे अंकुर सीड्स बियाणे कंपनीकडून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०४/२०२२
सामाजिक बांधिलकी म्हणून पाचोरा तालुक्यातील म्हसास येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. दिपक भाऊ राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना अंकुर सीड्स बियाणे कंपनीकडून वह्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी म्हसास येथील धनश्री कृषी केंद्राचे संचालक संदीप देवरे, सरपंच संजय पाटील, पोलीस पाटील अनिल पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजु राठोड, शाळेचे मुख्यध्यापक श्री. रत्नाकर पाटील सर, प्रगतिशील शेतकरी योगेश पाटील, ईश्वर, पाटील, सुधाकर पटील शाळा समितीचे उपाध्यक्ष, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व इतर कर्मचारी रुंद उपस्थित होते.
या वह्या वाटप कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी अंकुर सीड्स कंपनीचे प्रतिनिधी मा. श्री. राहुल निकाम, पाचोरा प्रतिनिधी मा. श्री. बबलु तडवी, शिक्षक व इतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. अंकुर सीडस कंपनी कडून हा उपक्रम राबविल्या बद्दल शाळेकडून व पालकवर्गाकडू आभार व्यक्त करण्यात आले.