ज्येष्ठ शाहीर शिवाजीराव पाटील यांना जळगाव येथे लोककला विकास प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार पालकमंत्री यांच्या हस्ते प्रदान.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०२/२०२२
नगरदेवळा तालुका पाचोरा प्रतिनिधी,
खानदेशातील व महाराष्ट्रातील आपल्या लेखणीने व आवाजाने ज्यांनी सबंध महाराष्ट्राला भुरळ घातली असे नगर देवळा तालुका पाचोरा येथील रहिवासी कथा महाराष्ट्र शाहीर परिषदेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष व खान्देश लोकरंग फाउंडेशनचे अध्यक्ष सुप्रसिद्ध लोकशाहीर समाजभूषण श्री शिवाजीराव पाटील यांना त्यांच्या शाहिरी क्षेत्रातील मौल्यवान कार्याबद्दल जळगाव येथे काल संपन्न झालेल्या खानदेश लोककला विकास प्रतिष्ठान तर्फे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री माननीय नामदार श्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते स्वर्गीय शाहीर दिलीप सखाराम जोशी स्मृती जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह मानपत्र मानाचा फेटा व रोख पाच हजार रुपये असे होते यावेळी व्यासपीठावर खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष श्री विनोद भाऊ ढगे तसेच गजानन महाराज वरसाडेकर महाराष्ट्र राज्याचे तमाशा क्षेत्राचे अध्यक्ष आदरणीय श्री संभाजीराजे जाधव यांच्यासह खानदेशातील तमाम वही गायक उपस्थित होते हा सोहळा बालगंधर्व नाट्यगृह जळगाव येथे संपन्न झाला यावेळी पालकमंत्री यांनी शाहीर शिवाजीराव पाटील यांच्या कार्याचा विशेष गौरव केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी खान्देश लोककला विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री विनोद भाऊ ढगे त्यांच्यासोबत सचिन महाजन दुर्गेश आंबेकर यांच्यासह खानदेशातील 250 वही गायन लोककला पथक उपस्थित होते.