३० जानेवारी महात्मा गांधीजींची पुण्यतिथी निमित्त खासलेख, महात्मा गांधीच्या विचारांची आज भारताला सर्वाधिक गरज.
गौरव जैन.(कुसुंबा)
दिनांक~०९/०२/२०२२
भारतातच आज जातीय आणि धार्मिक तणाव आहेत. भाषिक आणि प्रांतिक तणाव आहेत. व्यभिचार माजला आहे. भ्रष्टाचारात देश रसातळाला पोहचला आहे. अशा प्रसंगी भगवान महावीर भगवान गौतम बुद्ध यांच्या अहिंसा आणि शांतीच्या दूतांचा वावरही या भूमीने पाहिले आहे यांचा वारसा जपणारे आणि सांगणारे म. गांधी याच देशात होऊन गेले. म. गांधींच्या विचारांची अचारांची बैठक मानवता आणि नैतिकतेच्या पायावर उभी राहिलेली आहे. त्यामुळेच आज भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला म. गांधीच्या विचारांची गरज आहे. देशाला एक संघ शांत व अहिंसक ठेवायचे असेल तर महात्मा गांधी यांच्या विचारांना पूनरोजिवित करावे लागेल. कधी नव्हे तेवढी आज भारताला त्यांच्या विचारांची गरज आहे. ३० जानेवारी महात्मा गांधी यांची पुण्यतिथी दिनानिमित्त खान्देश जैन समाजाचे प्रसिद्धी प्रमुख व खान्देश जैन पत्रकार सतीश वसंतीलाल जैन कुसुंबा धुळे यांच्या खासलेखणातून गांधीजींच्या विचारांचा उहापोहचा इवलासा प्रयत्न आणि मानवजात जगायचे असेल तर मनामनात गांधी विचार पेरा. हिच त्यांची पुण्यतिथी साजरी केल्याचे सार्थकी ठरेल..
भ्रष्टाचार ,अनाचार ,हिंसाचार, व्यभिचार ,गुंडागर्दी या सा-याबरोबरच अखिल मानवजातीला वेठीस धरू पाहाणारा महाकाय राक्षस, दहशतवादाच्या रूपाने आज समोर ठाकलेला आहे . त्यामुळे अखिल जगत तिस-या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे की काय अशी भीती सा-या मानवजातीला भेड़सावत आहे .सारे जग असे कंपायमान होत असताना ,आपल्या देशाची भूमिका आज अतिशय महत्वाची ठरणार आहे. कारण भारतासारख्या खंडप्राय देशाने आपली मानवतेवरील श्रद्धा आणी आचरणाची नैतिकता प्राणपणाने जपलेली आहे . याला कारण आहे, आपल्या देशाला लाभलेला वैचारिक वारसा! आपल्या देशात राम आणि कृष्ण ही देवत्वाला पोहोचलेली दैवी शक्ति वास करीत असतानाच महावीर, गौतम बुद्ध यांच्या अहिंसा आणि शांतिच्या दूतांचा वावरही या भूमिने पाहिलेला आहे . जसे शूर, धाडसी, लढवय्ये या देशाने पहिले तसेच ज्ञानेश्वर, तुकारामदी संतही या देशाला पुनीत करुण गेले. भगवान महावीर ,भगवान बुद्धाचा वारसा जपणारे आणि सांगणारे महात्मा गांधी याच देशात होऊन गेले. महात्मा गांधींच्या विचारांची -आचारांची बैठक मानवता आणि नैतिकतेच्या पायावर उभी राहिलेली आहे. त्यामुळेच आज भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला महात्मा गांधींच्या विचारांची गरज आहे , असे म्हटल्यास अतिशयोक्ति ठरणार नाही. महात्मा गांधींची सत्य परोपकार, समानता, स्वदेशी या बाबींवरील श्रध्दा वादातील आहे. केवळ आपल्या देशाचाच वाचार करायचा झाल्यास आज भारत विनाशाच्या गर्तेकडे ओढला जातो आहे ,हे निर्विवाद सत्य आहे , याला जबाबदार बाह्यघटक असतीलही, परंतु भारतातच आज जातीय आणि धार्मिक तणाव आहेत. भाषिक आणि प्रांतिक तणाव आहेत. व्याभिचार माजला आहे . भ्रष्टाचाराने देश रसातळाला पोहोचला आहे. या सा-याचे मूळ जे राजकारण आहे त्या राजकरणामुळे देशाचा गाडा पांगुळगाडा झालेला आहे. या राजकारणाने देश दुस-या फाळमीच्या उंबरड्यावर उभा आहे .असे असले तरी येथील राजकारण्यांना याचे काही सोयरसुतक आहे असे वाटत नाही. पुनश्च भारत विस्कळीत झाला आहे देशाला एक संघ शांत व अहिंसक ठेवायची असेल तर महात्मा गांधींच्या विचारांना पुनर्जीवित करावे लागेल कधी नव्हे तेवढी आज भारताला त्यांच्या विचारांची गरज आहे. महात्मा गांधींनी समतेची शिकवण आयुष्यभर दिली. सर्वांना समान संधी हे त्यांच्या विचारांचे मर्मसुत्र आहे. हे सूत्रच आज आपण दृष्टीआड करून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद महाराष्ट्रात विदर्भ या स्वतंत्र राज्यची मागणी कश्मीरचा लचका तोडण्याची परदेशी, अतिरेक्यांची भूमिका आशा स्तरावर भारतात आज रान पेटले आहे. हा वणवा असाच पसरत राहीला तर कधीकाळी भारत हा खंडप्राय, एकसंध देश होता, यावर विश्वास बसणार नाही. असा विश्वास अबाधीत ठेवायचा असेल तर महात्मा गांधींच्या विचारांची देशाला आज निकडीची गरज आहे, दंगे होतात, बाँम्बस्फोट होतात, युध्देही होतात. त्यात कित्येक माणसे मारली जातात.परंतु विमानांचे अपहरण करून विमानाच्या धड़केने अति संवेदनशील ठिकानावर आघात करून निरपराध माणसांना मारायचे म्हणजेआपल्या कल्पनाशक्तिच्या बाहेरचे आहे. कुठल्या जगात आपण वावरतो आहोत? आपल्या जीवनाचे उद्दिष्ट काय आहे? हेच कळेनासे झाले आहे . निरपराध्यांचे जीवन अकालीच संपविण्याचा काय अधिकार आहे आपल्याला? माणसांचे हक्क काय आहेत? माणसांची कर्तव्य काय आहेत?माणसा माणसांमधील संबध कोणत्या पायावर आधारलेली आहेत? अन्याय कशाला म्हणावे? न्याय म्हणजे तरी काय? अशी संभ्रमावस्था निर्माण करणारी आणि न संपणारी अगणित प्रश्न संख्या आज आपल्या समोर, संपूर्ण मानव जाति समोर आवासून उभी आहेत. आधुनिक समाजशास्त्रात व्यक्ति हिताची व समाजहिताची पर्यायाने मानव हिताची चिकित्सा हटवादी पद्धतीने केली जाते. अशी ही हटवादी पद्धतीची चिकित्सा योग्य वाटत असली तरी महात्मा गांधींची याबाबतची विचारसणी अगदी वेगळ्या स्वरूपाची आहे. मानवाच्या भौतिक उत्कर्षापेक्षा त्याचा अध्यात्मिक विकास हे मानवी जीवनाचे उद्दिष्ट असले पाहिजे. असे त्यांचे मत होते. त्यांनी मानवी व्यवहारांचा संबंध नितीशी जोडला आहै. समाजशास्त्राज्ञ तो बुध्दिशी जोडतात. ते बव्हंशी खोटे नाही. परंतु व्यैयक्तिक व सामुदायिक कृति कती सत्यच्या शोधासाठीच झाली पाहिजे. अशी त्यांची अढळ निष्ठा होती. कारण सत्य हेच मानवाचे उद्दिष्ट असले पाहिजे. सत्य म्हणजेच ईश्वर ही त्यांची श्रद्धा होती. माणसांची जगण्यासाठी चाललेली धडपड ही ईश्वराप्रत जाण्यासाठी असली पाहिजे. त्यातच मानव जातीचे कल्याण आहे. कारण सत्य म्हणजेच ईश्वर आहे, अशी त्यांची मनोमन श्रद्धा होती. तेच भारतालाही शत्रु मानत आहेत. त्यामुळे त्यांचा काटा परस्पर निघाला तर आपणाला हवेच आहे. परंतु इथेच भारताने संयमीपणाने वागणे गरजेचे आहे. कारण युद्ध हे त्यावरचे उत्तर असू शकत नाही भगवान महावीर व बुद्ध हेच त्यावरचे योग्य उत्तर आहे आणि भगवान महावीर बुध्दांचाच विचार महात्मा गांधींनी पुढ़े वारसापरंपरेने मांडलेला आहे. शांतिदूतांच्या शांतिचा विचारच महात्मा गांधीनी त्यारवच्या उत्तरा दाखल सांगितला आहे .महात्मा गांधींनी हाच विचार भारत वर्षाला दिलेला आहे. त्यामुळे भारताला सा-या जगाला अहिंसा आणि शांतिचा विचार आत्मसात करायला लावण्याची भूमिका पार पाडायची आहे. भारताने युद्ध करणा-या राष्ट्रांना हे पटवून दिले पाहिजे की युध्द म्हणजे नाश आणि आता जर युध्द झाले तर ती सर्वांचाच नाश ठरणार आहे. कारण आता होणारे युध्द हे महायुध्दाचे रूप घेणार आहे . तिसरे आणि अंतिम महायुध्दच सा-या जगाचा नाश करणार आहे! या महायुध्दाने सारी मानव जातच नष्ट होणार आहे. त्यामुळे सर्वांनी संयम हा राखलाच पाहिजे. भगवान महावीरांचा आणि महात्मा गांधींचा विचार जोपासला पाहिजे. अहिंसा आणि शांतिचा विचार आत्मसात करून संपूर्ण मानव जातिचे तारण केले पाहिजे. आज संपूर्ण मानव जातीचे तारण महात्मा गांधीच्या विचारांमुळेच होऊ शकेल, असे जगाला ओरडून सांगण्याची जबाबदारी भारतावर येऊन पडली आहे. मानवजात जगवायची असेल तर मनामनात गांधी विचार पेरा.
सतिश वसंतीलाल जैन
कुसुंबा ता. जि. धुळे
खान्देश जैन समाजाचे प्रसिध्दी
प्रमुख व पत्रकार
मो.नं -9421537617