बेलापूरचे व्यापारी गौतम हिरणच्या खुन्यांना अटक करण्यासाठी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे बुधवारी राज्यव्यापी आंदोलन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०३/२०२१
बेलापूर (जि. अहमदनगर) येथील प्रथितयश व्यापारी गौतम हिरण यांचे १ मार्च रोजी अपहरण होऊन निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह ६ दिवसांनी सापडला. पोलीसांच्या निष्क्रियतेमुळेच हा बळी गेल्याची महाराष्ट्रातील व्यापारी वर्ग व समाजाची भावना असून या अपहरणाचे व खुनाचे सूत्रधार व आरोपी यांना पकडून योग्य शासन होण्यासाठी भाजपा अल्पसंख्याक मोर्चा तर्फे बुधवारी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष एजाज देशमुख व भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जैन समाज प्रमुख संदीप भंडारी ह्यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रात तब्बल ११० हुन अधिक ठीकाणी आंदोलन व निर्दर्शन करुण स्थानिक प्रशासन, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख / तहसीलदार ह्यांना निवेदन देण्यात आले अशी माहीती प्रदेश प्रमुख संदीप भंडारी व प्रदेश उप प्रमुख नीलेश मर्चेन्ट ह्यानी दिली.
अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी ह्यांच्या नेतृत्ववात सकल जैन समाजाने ही या राज्यव्यापी आंदोलनाला भाग घेतला.
या अपहरणकर्त्या गुन्हेगारांना ताबडतोब शोधून त्यांना कठोर शासन व्हावे व ह्या प्रकरणात एस.आय.टी. गठित व्हावी अशी मागणी ह्या वेळी करण्यात आली.