राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तळोदा शहराध्यक्षपदी योगेश मराठे.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०८/२०२१
तळोदा येथील योगेश शांताराम मराठे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तळोदा शहराध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांनी नुकतेच दिले आहे.
कामाप्रती असलेला आपला आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी व सातत्य पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सांसदरत्न खा.सुप्रियाताई सुळे यांचे विचार आणि महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रश्नावरील भूमिका सर्वसामान्य जनतेपर्यत पोहोचविण्यासाठी कार्यकरण्यासाठी योगेश मराठे यांची राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून निवडीचे पत्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष डाॅ.अभिजीत मोरे यांच्या हस्ते योगेश मराठे यांना देण्यात आले.
याप्रंसगी युवा नेते अॅड.राऊ बाबा मोरे,भटक्या विमुक्त जाती प्रदेश उपाध्यक्ष श्री.नरेश पवार,ओबीसी सेल प्रदेश सरचिटणीस श्री.कमलेश चौधरी,जिल्हा उपाध्यक्ष श्री.शांतीलाल साळी,अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष जाकीरमिया जहागिरदार,जिल्हा उपाध्यक्ष श्री.रामराम आघाडे,सहकार सेल जिल्हाध्यक्ष श्री.पुरुसोत्तम चव्हाण,नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप,शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर,सेवादल जिल्हाध्यक्ष रविंद्र जावरे,नगरसेवक हितेंद्र क्षेत्रिय, नगरसेवक संदिप परदेशी, युवक शहराध्यक्ष लल्ला मराठे, केशरसिंग क्षेत्रिय, निलेश चौधरी, हेमंत बिरारे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्ये उपस्थित होते.
या निवडीबद्दल योगेश मराठे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.