आठवणीतील आदर्श व्यक्तिमत्व स्व. मनोहर देवरे.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०८/२०२२
पाचोरा तालुक्यातील लासुरे येथील कष्टकरी शेतकरी, समाजसेवक, मितभाषी आदर्श व्यक्तिमत्व असलेले स्व. मनोहर तुकाराम देवरे हे आपल्यातून जाऊन एक वर्ष पूर्ण होत आहे.
स्व. मनोहर देवरे हे लासुरे येथील कष्टकरी शेतकरी तसेच मनमिळाऊ स्वभावाचे असल्याकारणाने ते सामाजिक, धार्मिक व इतर कार्यक्रमात सहभागी होऊन आपला सहभाग नोंदवायचे तसेच त्यांच्या विनोदी स्वभावामुळे ते समोरच्या व्यक्तीला आपलेसे करुन घेत होते.
एक मुलगा, एक मुलगी, पत्नी असा सुखी परिवार असतांनाच एक वर्षापूर्वी त्यांचे अकस्मात निधन झाले. व ते सगळ्यांना सोडून निघून गेले. त्यांच्या अशा अचानकपणे जाण्यामुळे घर परिवारात, समाजात, गावात एक पोकळी निर्माण झाली आहे.
आज त्यांना एक वर्ष पूर्ण होत असून लासुरे ग्रामस्थांनी एक छोटेखानी कार्यक्रम घेऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी स्व. मनोहर देवरे यांच्या परिवारातील दिपक, सुदाम तसेच लासुरे गावचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी व ग्रामस उपस्थित होते.