भैरवनाथ बाबा यात्रा उत्सवावर यावर्षीही कोरोनाचे सावट, यात्रा उत्सव बंद, बंद, बंद असल्याचे भैरवनाथ संस्थानतर्फे जाहीर.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०१/२०२२
पाचोरा तालुक्यातील सावखेडा बुद्रुक येथे भैरवनाथ बाबांचे जागृत देवस्थान असून या ठिकाणी सालाबादाप्रमाणे पौष महिन्याच्या प्रत्येक रविवारी मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असते परंतु यावर्षी आपल्या देशातसह जळगाव जिल्ह्यात कोरोना व ओमायक्रॉन आजाराची लागण झपाट्याने पसरत असून या आजारापासून सुरक्षित रहाण्याच्या दृष्टिकोनातून शासनाचे व मा.जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशाप्रमाणे भैरवनाथ संस्थानला पिंपळगाव (हरे.) पोलीस स्टेशन तर्फे अटी शर्तींसह नोटीस बजावून दुकाने लावण्यास व गर्दी करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
त्याअनुषंगाने यावर्षी सावखेडा येथे पौष महीन्यात रविवारी दि. ०९/०१/२०२२, दि. १६/०१/२०२२ , दि. २३/०१/२०२२ व दि. ३०/०१/२०२२ रोजी यात्रा उत्सव दिवस येत आहे. म्हणून या यात्रोत्सवा करीता परीसरातील तसेच आजुबाजुच्या तालुक्यातील व पाचोरा तालुक्यातील तसेच मराठवाडा, गुजरात, मध्यप्रदेश येथील हिंन्दु-मुस्लीम बांधवांनी सद्यस्थितीत असलेल्या परिस्थीतीची जाणीव ठेवून दर्शनासाठी येऊ नये तसेच पाळणे, हॉटेल, छोटे सर्कस, मोटार सायकल कर्तबगार, कटलरी सामानाची दुकानदारांनी या यात्रेत आपल्या व्यवसायाची दुकाने आणून यात्रा भरवण्याचा प्रयत्न करू नये सोबतच या यात्रेत दाळ बट्टीचा नवस फेडण्याची प्रथा असून असे नवस फेडण्यासाठी भाविक, भक्तांनी येऊ नये असे भैरवनाथ संस्थांन सावखेडा यांनी कळवले आहे.
कारण श्री.क्षेत्र भैरवनाथ महाराज यांचे मंदीर जागृत देवस्थान असुन सर्व आजुबाजुच्या परिसरातील, आजुबाजुच्या गावातील लागून असलेले खेड्या पाड्यातील व जवळील तालुक्यातुन महीला व पुरुष भाविक सावखेडा बु. येथे हजारोच्या संख्येने येतात. म्हणून गेल्या वर्षी वाढत्या कोरोना विषाणुच्या अनुषंगाने यात्रेवर बंदी घालण्यात आली होती. परंतु या वर्षी शासनाने काही अटी व शर्थीच्या नियमांच्या निर्बंध घातलेल्या आदेशाला अनुसरुन मोजक्या व्यक्तींत्या उपस्थीती पुजनाचे कार्यक्रम साजरे करावयाची परवानगी दिलेली आहे.
पुजनाची परवानगी मिळाली असली तरी मोठ्या संखेने भाविक येण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास सदर मंदीरात दर्शना करीता लांबलाबच्या गावाचे भाविक (वाहनासह) तसेच नवस फेडण्यासाठी येतील अशी शक्यता आहे. परंतु सदर मंदीराचे जवळील जागा लहान असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन सोशल डिस्टन्सींगचा फज्जा होऊन शासनाच्या अटी व नियमांचा भंग होऊन शासनाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये म्हणून यावर्षी यात्रा उत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा बाबत सुचना देण्यात याव्यात याकरिता गावा-गावांना परीसरात दवंडी फिरवण्यात यावी व प्रसार माध्यमातुन यात्रा / धार्मीक कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थीती बाबत कळवीण्यात यावे व ठीक ठीकाणी त्या बाबत बॅनर व होल्डींग लावण्यात यावे अशी सुचना पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन तर्फे भैरवनाथ संस्थान सावखेडा यांना देण्यात आली होती त्या नोटीसची दखल घेत सावखेडा भैरवनाथ संस्थानतर्फे पुढील प्रमाणे सुचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
या सूचनेप्रमाणे यात्रा उत्सवाचे दिवशी परंपरेनुसार मंदीरात मोजक्या लोकांच्या उपस्थीतीत पुजन करण्यात येणार असल्याने उत्सव व दर्शना करीता बाहेरगावाहून येणाऱ्या भाविक, भक्तांना यात्रेत येण्यास मनाई करण्यात आली असून मंदिरात दर्शनासाठी बंदी घालण्यात आली आहे. असे भैरवनाथ संस्थान कडून जाहीर करण्यात आलेले आहे.
तरीही कुणी वरील नियम व अटींचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध कोरोना विषाणु कोव्हीड-१९ विषाणुच्या ओमिक्रॉन (Omicron) या नविन विषाणुचा प्रादुर्भाव व आजाराला रोखण्यासाठी शासनाने राज्यात लागु केलेला साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ तसेच नागरीकांचे जिविताचे रक्षण व्हावे नागरीक आजारापासुन सुरक्षीत रहावे या करीता मा. जिल्हाधिकारी सो. जळगाव यांचे कडील आदेश क्र. दंडप्र/०१/कावि/८९५/२०२१ दि. २५/१२/२०२१ अन्वये व सुधारीत दि. ३१/१२/२०२१ अन्वये १) आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ २) भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ व इतर विभाग यांचे कडिल पत्र सुरक्षा उपाययोजना बाबतआदेश कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे भैरवनाथ संस्थांतर्फे जाहीर करण्यात आले आहे.