जळगाव जिल्ह्यात आज तब्बल ९८६ कोरोनाबाधीत आढळले. शासन, प्रशासनाला जनतेच्या सहकार्याची आपेक्षा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०३/२०२१
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून आज तब्बल ९८६ नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आता मास्क लावणे आणि जास्त खबरदारी घेणे अत्यावश्यक बनलेले आहे.
आज जिल्ह्यात जळगाव शहर ३५०, जळगाव ग्रामीण २६, भुसावळ ८९ ,अमळनेर २, चोपडा १४१,पाचोरा ४६, भडगाव ०२ ,धरणगाव ३४,यावल ३२,एरंडोल ७९,जामनेर ६७, रावेर २४,पारोळा ३३, चाळीसगाव ०९,मुक्ताईनगर १८, बोदवड ३१ आणि इतर जिल्ह्यातील ०३ असे एकूण ९८६ रूग्ण आज कोरोनाबाधीत आढळून आलेले आहे.
आज दिवसभरात ४१८ रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण ६९६४८ रूग्ण बरे झालेले आहे. जिल्ह्यात सध्या ६७१३ ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या ६०९३५ इतकी झालेली आहे. जिल्ह्यात आज ६ रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण १४३८ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.अशी माहिती आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
[सगळ्यांची एकजूट हीच कोरोनाचा नायनाट करण्यासाठी ठरेल वज्रमुठ.]