दिगम्बराचार्य विद्यासागरजी मुनीश्रींच्या ५० व्या आचार्य पदारोहण दिनानिमित्त विशेष पोस्ट तिकीट व पाकीट कुसुंब्यासह जैन समाजात खान्देशात आनंदोत्सव.
गौरव जैन.(कुसुंबा)
दिनांक~०५/१२/२०२१
जैन समाजाचे अग्रगण्य समजले जाणारे विशाल संघाचे गणनायक सा-या विश्वातील भाविकांचे लक्ष वेधून घेणारे दिगम्बराचार्य युगप्रवर्तक युगवेत्ता महाकवी आत्मानुशासक संत शिरोमणी शासनाचार्य अध्यात्मिक संत तपस्वी प.पू. श्री १०८ आचार्य विद्यासागर महाराज यांच्या दिगम्बर जैन दिक्षेला ५३ वर्षे झाली तर त्यांच्या आचार्य पदाला पन्नास वर्षे झाल्यानीमित्त पूज्य विद्यासागर महाराज यांच्यावर आधारित पोस्ट तिकीट व विशेष पोस्ट पाकीट प्रकाशित करण्यात आले असल्याची माहिती कुसुंबा जैन अतिशय क्षेत्राचे विश्वस्त तसेच खान्देश जैन समाजाचे प्रसीध्दी प्रमुख व खान्देश जैन पत्रकार सतीश वसंतीलाल जैन ,कुसुंबा तसेच सागर सुभाष जैन ,पिंपळगाव यांनी दिली.
पोस्ट आँफीस रमणमळा, कोल्हापुर येथे २२ नोव्हेंबर सोमवार रोजी दुपारी हा सोहळा संपन्न झाला आहे. त्याप्रसंगी रूपेश सोनावले प्रवर अधीक्षक डाकघर कोल्हापूर विभाग यांच्या हस्ते तर प्रमुख पाहुणे म्हणून मोहनकुमार वणकुंद्रे अधिकारी मर्चंट नेव्ही होते अध्यक्ष स्थानी डाँ. सुषमा जंगटे ट्रस्टी विद्यासन्मती दास सेवा संस्था आदि मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला .ज्यांच्या नावाने पोस्टाचे तीकीट व पाकीट काढण्यात आले आसे प.पू. तपस्वी आचार्य विद्यासागरजी महाराज यांचे परम शिष्य खान्देशातील कुसुंबा (धुळे) जन्मभूमीत निपजलेले महान रत्न कुसुंबा गौरव प.पू. श्री १०८ समाधीसागरजी महाराज (गृहस्थाश्रमाचे नांव राजेंद्र वसंतीलाल जैन ) होत.
आचार्यश्रींच्या नावाचे पोस्टाचे तिकीट निघाल्याबद्दल कुसुंबासह खान्देशातील विविध गावात आनंद व्यक्त झाला. देशभरामध्ये जैन दिगम्बर साधूचे मार्गदर्शक महाकवी आचार्य महाराज हे मुळचे सदलगा (ता.चिकोडी) गावाचे त्यांनी ३० जून १९६८ रोजी अजमेर येथे पूज्य आचार्य श्री ज्ञानसागर जी महाराज यांच्या कडुन दिक्षा धारण केली. त्यानंतर विद्यासागर महाराज यांचे विव्दत्ता पाहुव २२ नोव्हेंबर १९७२ ला नसिराबाद (जि. अजमेर) येथे यआचार्य पद दिले आचार्य पद ग्रहण करूण २२ नोव्हेंबर ला तब्बल ५० वर्षे होत आहेत म.प्र. ५० वर्षात त्यांनी ५०,०००कि. मी. हून अधिक प्रवास पायी केला आहे . या काळात धर्म प्रभावना, अहिंसेचा संदेश ,त्यांनी दिला आहे. या काळात महाराजांनी जवळ -जवळ ५०० ब्रम्हचारी आणि ब्रम्हचारिणींना त्याग व संयमाचे अनुकरण करण्यास प्रेरणा देऊन दिक्षीत केले आहे . ते स्वत: हिन्दी ,कन्नड, मराठी, प्राकत, संस्कृत, शिवाय अनेक भाषांचे विद्वान आहेत . सिध्द, हस्त, कवी लेखक म्हणुन सुध्दा त्यांचे साहित्य क्षेत्रात ख्याती आहे. त्यांचे मुकमाटी हे महाकाम भारतातील बहुतांशी भाषेत अनुवादीत झाले आहे . शिवाय अनेक विद्यापीठा मध्ये अभ्यासक्रमात देखील आहे देशामध्ये ७५ गोशाला त्यांनी सुरु केल्या आहेत. ज्यामध्ये १,००,०००पेक्षा अधिक गोवंश सुरक्षित झालेले आहेत. मध्यप्रदेश येथील जबलपूर ,इंदौर , छत्तीसगढ मधील डोंगरगड ,महाराष्ट्रातील रामटेक व उत्तरप्रदेशमधील ललीतपूर या ठिकाणी प्रतिभास्थली नावाने बालीका शिक्षा केंद्र सुरू करूण बालीका सशक्ती करणाचे कार्य केले आहे उत्तर महाराष्ट्रातील भक्त गणात महेश नगीनदास शाह ,धुळे सुरेश दोधूसा जैन,बेटावद महेंद्र हिरालाल जैन ,गौरव उल्हास जैन, पंकज नगिनदास जैन, मयूर रिखबचंद जैन, वालचंद रतनलाल जैन, शितल अरूण जैन, सतीश मणिलाल जैन(चोपडा), सुधीर फुलचंद जैन (चोपडा), शरद मन्नालाल जैन(कापडणा), प्रकाश बाबुलाल जैन(शिरसाळा), नितीन जैन (शिरसाळा), प्रफूल्ल अशोक जैन (शेदुर्णी), सतीश वसंतीलाल जैन, रमेश संपतलाल जैन (पारोळा), गणेश कोचर (बळसाणे),विजय बाफना(शिरपूर),हितेश रमेश जैन (पारोळा), सागर सुभाष जैन(पिंपळगाव हरे.), मौजू राजूलाल जैन(पिंपळगाव हरे.),सुभाष डुमनदास जैन(पिंपळगाव हरे.), शरद मोतीलाल जैन(सोनगीर), महावीर कोचर(जैन) जि.प.स. (बळसाणे), राहुल सुंदरलाल जैन ,विपुल अशोक जैन, स्वप्नील महेंद्र जैन, पारस नवनितलाल जैन, राजेंद्र नवनितलाल जैन, दिलीप फुलचंद जैन(पिंपळगाव हरे.), राहुल रविंद्र जैन (चिंचपाडा), आदिसमाज बांधव आणि पार्श्वनाथ सेवा समिती व पद्मावती युवामंचांनी आनंद व्यक्त केला.