सावधान जळगाव जिल्ह्यात आज ८८ कोरोना बाधित रूग्ण आढळले.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०१/२०२२
जळगाव जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोकंवर काढले असून आज जिल्ह्यात तब्बल ८८ नवीन बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यात जळगाव शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब अशी की आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तसेच आज दिवसभरात एक रूग्ण बरा होवून घरी परतला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४३ हजार ४० बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २३८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजच्या अहवालात जळगाव शहरासह चोपडा आणि अमळनेर तालुक्यातील रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे अहवालात दिसून आले आहे.
आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर -३१, भुसावळ तालुका-२४, चोपडा-२७, यावल-२, रावेर-१, चाळीसगाव -३ असे एकुण ८८ बाधित रूग्ण आढळले आहे. आता जिल्ह्यात २२३ बाधित रूग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहे. म्हणून आता जनतेने सतर्क राहून लवकरात लवकर लसीकरण करुन घेत, शासनाच्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करुन शासनाला सहकार्य करण्याची गरज आहे.