स्वतंत्र कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून एरंडोल येथे तहसील कार्यालयावर मोर्चा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/११/२०२०
आज एरंडोल येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सर्व ओबीसी समाज संघटनांच्या वतीने ओबीसी आरक्षण वाचवण्यासह ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी तसेच ओबीसी आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लागता स्वतंत्र कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन शिस्तबद्ध पद्धतीने महात्मा फुले पुतळा ते तहसील कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थित सर्वांनी संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान प्रस्तावनेचे सामुहिक वाचन केले. या प्रसंगी देविदास महाजन, अशोक चौधरी,शालिग्राम गायकवाड,गोपाल शामु पाटील,समता परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष वसंत पाटील,महिला जिल्हाध्यक्षा सरिता माळी-कोल्हे,निवेदिता ताठे,भारती काळे,भारती म्हस्के,राकेश कंडारे,गुलाब चौधरी,विठ्ठल आंधळे, अरुण माळी,मदन भावसार, प्रकाश महाले, डॉ.राजेंद्र चौधरी,दुर्गादास महाजन,शांताराम महाजन,पी.जी.चौधरी,डाॅ.प्रताप महाजन,रमेश महाजन,विजय महाजन,प्रकाश महाजन,रुपेश महाजन,संजय महाजन,राजेंद्र महाजन,गोपाल बडगुजर,संजय शिंपी, प्रफुल्ल महाजन, रामभाऊ गांगुर्डे, प्रमोद महाजन,अस्लम पिंजारी,मोहसीन खाटीक,विक्रम सैंदाणे, भिकचंद महाजन,युवराज महाजन,सुदर्शन महाजन,संदिप पाटील,पुंडलिक चौधरी,संजय चौधरी,राजधर महाजन,कैलास महाजन,राजेश शिंपी इ. बारा बलुतेदार समाजातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
मोर्चाच्या यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष अरुण गुलाब महाजन,कार्याध्यक्ष गजानन महाजन,शहराध्यक्ष सागर महाजन,युवक जिल्हाध्यक्ष योगेश महाजन,शहर कार्याध्यक्ष निलेश देवरे,कमलेश महाजन,सोमनाथ महाजन, राकेश महाजन, समाधान महाजन, मनोज महाजन, नितीन महाजन, गणेश महाजन, मोहन महाजन, सचिन महाजन, गोपाल महाजन, कविराज पाटील,किशोर महाजन, हिंमत महाजन,शरद चौधरी, समाधान निकम,अजय देशमुख, गणेश मिस्त्री यांनी परीश्रम घेतले.