पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/१२/२०२१
(प्रशिक्षण स्थळी कोविड ~ १९ चे नियम लागू रहातील.)
महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व पद्मालय फार्मसी प्रोड्युसर कंपनी शिवनी तालुका भडगाव यांचे संयुक्त विद्यमाने सन २०२१ व २२ या वर्षाकरिता कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) योजनेअंतर्गत कौशल्य आधारित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम दिनांक २९ डिसेंबर बुधवार रोजी सकाळी ठीक ०८ वाजता रामदेव लॉन्स जारगाव चौफुली पाचोरा येथे घेण्यात येणार असून या कार्यक्रमात रब्बी हंगामातील हरभरा, कांदा, लिंबूवर्गीय पिके यावर शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व प्रक्षिक्षण देण्यात येणार आहे.
या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन पाचोरा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सल्लागार समितीचे अध्यक्ष मा.श्री. रमेशचंद्रजी बाफना यांच्या अध्यक्षतेखाली व पाचोरा, भडगाव तालुक्याचे मा.आ.श्री. किशोर आप्पा यांच्या हस्ते होणार असून या मेळ्यावत मा.श्री.एस.के.ठाकुर (जिल्हा कृषी अधिकारी जळगाव), मा.श्री. मधुकर चौधरी.(उपसंचालक आत्मा जळगाव), मा.श्री. नंदकिशोर नईनवाड.(उप विभागीय कृषी अधिकारी पाचोरा) हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थितीत रहाणार आहेत.
तसेच या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात मा.डॉ. श्री. दत्तात्रय वने. कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी मानोरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर माननीय श्री वैभव सूर्यवंशी कृषी अभियांत्रिकी कृषी विभाग जळगाव मा. श्री. जाधव विषय तज्ञ कृषी विभाग जळगाव मार्गदर्शन करणार आहेत.
तरी या शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी उपस्थित राहून सहभ नोंदवावा असे अवाहन श्री.आर.एन.जाधव (तालुका कृषी अधिकारी पाचोरा), श्री. बी.बी.गोराडे. (तालुका कृषी अधिकारी भडगाव), श्री. ए.व्ही.जाधव. (मंडल कृषी अधिकारी नगरदेवळा), मा.श्री.के.एफ.पाटील. (मंडल कृषी अधिकारी कजगाव) मा.श्री. यु.आर.जाधव. (मंडल कृषी अधिकारी भडगाव) यांनी केले आहे.