कुऱ्हाड बुद्रुक येथील मुस्लिम कब्रस्तानसाठी, सरंक्षण जाळीच्या कामाचा शुभारंभ.
सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~२८/१२/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बुद्रुक येथील मुस्लिम बांधवांच्या कब्रस्तानच्या सुरक्षिततेसाठी मा.आमदार श्री. गिरीषभाऊ महाजन यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून १३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या मुस्लिम बांधवांच्या सरंक्षण जाळीचे (कंपाऊंड) कामाचा शुभारंभ दिनांक २८/१२/२०२१ मंगळवार रोजी भाजपचे नेते मा.श्री. संजय आबा पाटील, माजी सरपंच मा.श्री.किरण पाटील, लोहारा~कुऱ्हाड गटाचे भाजपचे गण प्रमुख मा.श्री. जगदीशभाऊ तेली, यांच्या हस्ते कुदळ मारुन करण्यात आला.
याप्रसंगी गावातील ग्रा.प.सदस्य श्री.पवन पाटील, ग्रा.प.सदस्य श्री.शिवाजी पाटील, ग्रा.प.सदस्य कालू मुसलमान, उपसरपंच श्री.नामदेव पाटील, माजी ग्रा.प.सदस्य श्री.राजू राठोड, श्री.शालीक पाटील, अजित मुसलमान, रुस्तम शेख, कमरुद्दीन शेख, शब्बीर शेख, श्री.विलास पाटील,श्री.आकाश पाटील, श्री.विनोद काळे, श्री.अमोल पाटील, श्री.सुरेश पाटील, श्री.बसराज बंजारा,श्री.लक्सिमन बंजारा, श्री.महादू बंजारा, श्री.इंद्रजित बंजारा, श्री.तुकाराम बंजारा, श्री.राजू सखाराम बंजारा, श्री.तुकाराम पाटील, अन्वर शेख व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.