पिंपळगाव हरेश्वर येथील तरूणीवर अत्याचार करणाऱ्यांना फासावर लटकवा; लहुजी संघर्ष सेनेचे निवेदन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०३/२०२१
संपूर्ण महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना तालुक्यातील पिंपळगाव (हरे.) येथे उघडकीस आली असुन या दुर्देवी घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा होवुन त्यांना फासावर लटकवावे या मागणीसाठी लहुजी संघर्ष सेनेने पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी लहुजी संघर्ष सेनेचे राज्याचे युवक अध्यक्ष स्वप्निल सपकाळे, उत्तर महाराष्ट्र सचिव नाना भालेराव, जिल्हाध्यक्ष सुखदेव आव्हाड, उपाध्यक्ष रवींद्र पवार, पाचोरा शहर अध्यक्ष गोपाल अहिरे, तालुका संघटक चेतन चव्हाण, ज्येष्ठ नेते मधुकर अहिरे, अर्जुन पवार (पिंपळगाव हरे.), लक्ष्मण पवार, पवन सपकाळे (वाघुलखेडा), राजु पवार उपस्थित होते.
पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा येथील एका तरुणीवर गेल्या काही महिन्यांपासून शेजारी महिलेच्या मध्यस्थीने वारंवार अत्याचार होत होते. होणाऱ्या अत्याचारामुळे सदरील तरुणी गर्भवती होवुन तिने एका मुलीचा जन्म दिला आहे. यानंतरही तरुणीवर महिलेच्या मदतीने अत्याचार सुरुच होते. या प्रकाराला कंटाळून पिडीत तरुणीने २६ फेब्रुवारी रोजी पिंपळगाव हरे. पाचोरा पोलिस स्टेशन गाठत निंबा सावळे, गोपाल पाटील, बापु उर्फ संजु आढाव, निलेश (पुर्णनाव माहित नाही), शिवाजी (पुर्ण नाव माहित नाही) व समीना लुकमान तडवी सर्व राहणार पिंपळगाव हरे. यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील चार आरोपींना पिंपळगाव हरे. पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुख्य सुत्रधार समीना तडवी सह एक आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहे. या घटनेचा तीव्र निषेध करत या प्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ जेरबंद करून सर्व आरोपींना फासावर लटकवावे. या मागणीसाठी लहुजी संघर्ष सेनेतर्फे पोलिस उपअधीक्षक भारत काकडे व पिंपळगाव हरे. पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक निता कायटे यांना निवेदन देण्यात आले आहे.