चिंचपुरे येथे विज पडून गाय व गोऱ्हा जागीच ठार, शेतकऱ्याचे एक लाख रुपयांचे नुकसान

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०६/२०२२
आज पाचोरा तालुक्यात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटात, वादळीवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली होती. वादळीवाऱ्यासह, पावसाला सुरुवात होताच शेतकरी शेतातील आऊत फाटा व इतर सामानाची जमवाजमव करुन घराकडे निघण्याच्या तयारीत असतांनाच चिंचपुरे येथे एका शेतकऱ्याचा शेतातील झाडावर अचानकपणे विज कोसळून झाडाखाली बांधलेली गाय व गोऱ्हा जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील चिंचपुरे शिवारात वेडुबा ओंकार पाटील यांच्या मिलकीची गट नंबर १५३ हि शेतजमीन आहे. या शेतातील झाडाखाली त्यांनी नियममितप्रमाणे गाय व गोऱ्हा बांधलेला होता. सायंकाळी विजांच्या कडकडाटात, वादळीवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली होती. म्हणून वेडुबा पाटील हे शेतातील इतर सामानाची आवराआवर करुन गाय व गोऱ्हा घरी घेऊन जाण्यासाठी गाव व गोऱ्हा बांधलेल्या झाडाकडे जात असतांनाच अचानकपणे जोराने विजेचा कडकडाट झाला व वेडुबा यांच्या डोळ्यासमोर प्रखर लखलखाट झाला व काही कळण्याच्या आतच त्यांच्या शेतातील झाडावर विज पडून झाडाखाली बांधलेली गाय व गोऱ्हा जागीच ठार झाले.
या आकस्मिक घटनेमुळे व वेडुबा पाटील यांची गाय व गोऱ्हा ठार झाल्याचे पाहून त्यांनी जागीच हंबरडा फोडला कारण अत्यंत गरिबीची परिस्थिती व त्यातच विज पडून गाय, गोऱ्हा ठार झाल्यामुळे त्यांचे जवळपास एक लाख रुपये नुकसान झाले आहे. म्हणून या नैसर्गिक आपत्तीत ठार झालेल्या गुरांची नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा चिंचपुरे ग्रामस्थांनी केली आहे.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
वेडुबा पाटील हे गाय व गोऱ्हा घरी घेऊन जाण्यासाठी झाडाकडे जात असतांनाच ते झाडापर्यंत पोहचण्याआधीच झाडावर विज कोसळली जर का वेडुबा पाटील हे गुर सोडण्याठी झाडापर्यंत पोहचले असते तर मोठा अनर्थ घडला असता परंतु नशिब बलवत्तर म्हणून ते बालबाल बचावले म्हणून काळ आला होता पण वेळ आली नव्हती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.