पोलीस निरीक्षक मा.श्री. राहूल खताळ साहेब यांना सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/१२/२०२१
सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद व माणुसकी रुग्णसेवा समुह शासकीय रुग्णालय घाटी, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष आणि सिंघम पोलीस निरीक्षक मा.श्री. राहूल खताळ यांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या पुरस्काराचा सोहळा दिनांक~ ३०-१२-२०२१ गुरुवार रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मौलाना आझाद संशोधन केंद्र, टीव्ही सेंटर औरंगाबाद येथे संपन्न होणार आहे. माणुसकीचा पाचवा वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा- सकाळी १०:०० वाजता महारक्तदान शिबीर शासकीय रत्त पेढि साठि- ०१:०० वा. मान्यवरांच्या हस्ते सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३१ व्यक्तीचां गुण गौरव या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
पोलीस निरीक्षक मा.श्री. राहूल खताळ हे सिंघम अधिकारी म्हणून ओळखले जातात. नक्षलवादी एरिया गडचिरोली मध्ये त्यांचे ट्रेनिंग झाले आहे, मुक्ताईनगर येथे गावगुंडांना खाकीची ताकद दाखऊन आरोपींना गावात धिंड काढून खुनातील आरोपी शोधून काढले होते, आणि जनसामान्य नागरिकांमधील भीती दूर केली होती.
कोरोणाच्या कठीण काळामध्ये त्यांची कामगिरी प्रशंसनीय आहे, अवैध धंद्यांवर व त्यांचा नेहमी वचक असतो, शांतता समितीच्या बैठका घेऊन गावात शांतता प्रस्थापित करण्यात ते यशस्वी झाले आहेत, पथनाट्याच्या माध्यमातून लोकांना जनजागृती ते करीत असतात, सामाजिक कार्यात त्यांची आवड रक्तदान शिबिरे घेणे आणि तिथे स्वतः आधी रक्तदान करून कार्यक्रमाची सुरुवात करीत तरुणांना नेहमी ते उपदेश करीत असतात.
एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा रक्तदान करून एकमेकांचा जीव वाचवावा असे ते सांगत असतात,अशा या महान कर्तुत्ववान शिस्तप्रिय पोलीस निरीक्षक मा.श्री. राहुल खताळ सरांना माणुसकी समुहाचा सेवा गौरव पुरस्कारासाठी निवड झाल्या बाबत पत्राद्वारे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित यांनी कळविले आहे.ह्या पुरस्काराबद्दल पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांचे समाजामध्ये सर्वेत्र कौतुक केले जात आहे.