पाचोरा शहरात शासनाच्या आदेशाची होत आहे पायमल्ली, सगळीकडे दिसत होते बिना मास्क फिरणारे शेख चिल्ली.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०२/२०२१
आज सगळीकडे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून क्षणाक्षणाला कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शासन यंत्रणा जिवापाड प्रयत्न करत असतांनाच दूसरीकडे मात्र सर्वसामान्य जनता हा विषय गांभीर्याने घेत नसून आता आमदार, खासदारांनसारखे समजदार लोकप्रतिनिधी सुध्दा कोरोनाचा आधार घेत राजकारण करण्यात गुंग झाले असल्याचे चित्र दिसत आहे.
दिनांक २० फेब्रुवारी शनिवारी पाचोरा येथे आठवडे बाजार भरतो या आठवडे बाजारात तसेच बसस्थानक, श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक, रेल्वे स्टेशन मार्ग, जैन पाठशाळा परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती.
विशेष म्हणजे प्रत्येकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असल्यावरही नव्वद टक्के लोकांनी मास्क लावलेला नव्हता तसेच बऱ्याचशा ठिकाणी लोक दाटीवाटीने गर्दीत फिरतांना दिसत होते व दुकानदारांनी व इतर व्यवसायीकांनी सुध्दा तोंडाला मास्क लावलेले नव्हते.
तर दुसरीकडे पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी दिवसभ मुख्य रहदारीच्या रस्त्यावर व चौकाचौकात बिनामास्क फिरणाऱ्या लोकांना धरुन दंडात्मक कारवाई करतांना दिसून येत होते. तरीही काही मनमानी करणारे ठग महाठग पोलिसांशी हुज्जत घालत होते.
हा प्रकार असाच सुरू राहिल्यास भविष्यात आपल्याला मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागेल अशी भिती व्यक्त केली जात असून लॉकडाऊनचे नियम कडक करुन नियम मोडणारांवर कठोर शासन करावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.