डॉ.मा.श्री. भूषण मगर यांना वैद्यकीय क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार प्रदान.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०१/२०२१
माणुसकी समूहाचा पाचवा वर्धापन दिन रक्तदान शिबीर व सेवा गौरव पुरस्कार सोहळ्याने मोठ्या थाटात संपन्न झाला. या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे संचालक डॉ.मा.श्री. भूषण मगर यांना सुलक्ष्मी सेवाभावी संस्था व माणूसकी रुग्णसेवा समुहाच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या मागील कारण म्हणजे विघ्नहर्ता म्हणजे संकटांचे निवारण करणार असेच विघ्नहर्ता हॉस्पिटलचे संचालक डॉ.मा.श्री. भुषण मगर दादा खरोखरच नावाप्रमाणेच पाचोरा व भडगाव तालुक्यातील जनतेसाठी रुग्णसेवा देतांना भुषण ठरत आहेत. कारण डॉ.मा.श्री. भूषण दादा मगर यांनी कोरोनासरख्या भिषण आजाराचे संकटसमयी स्वताच्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस सेवा तर दिलीच सोबतच सामाजिक जबाबदारी स्विकारुन आपले स्वतःचे खाजगी हॉस्पिटल शासनाला समर्पित करून महाराष्ट्रात पहिले कोविड सेंटर उभे करण्यासाठी हातभार लावला होता,
माणुसकी ग्रुपच्या रूपात असा एक ग्रुप बघितला ते कोणतीही अपेक्षा न करता फक्त समाज सेवा करणे हाच त्यांचा धर्म आहे, आणि माणुसकी समूहाची टीम थांबणारी नाही तर समाजातील तळागाळातील गोरगरीब गरजूंना अहोरात्र मदत करणारी टीम आहे. असे मनोगत डॉ.मा.श्री. भूषण मगर(संचालक. विघ्नहर्ता हॉस्पिटल पाचोरा) यांनी व्यक्त करत माणूसकी समूहाच्या कार्याचे कौतुक करुन शाबासकी दिली.