घरासमोर शिवस्मारक बांधण्यात येणार असल्याने मनस्थाप होऊन वरखेडी येथील एका व्यवसायीकाला ह्रदयविकाराचा झटका.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०२/२०२४
सद्यस्थितीत महाराष्ट्रातील गावागावातून शिवस्मारक बांधण्यात येत परंतु काही गावांमध्ये शिवस्मारक बांधतांना बाजारपेठ किंवा रहदारीला अडथळा निर्माण होईल किंवा जीथे शिवस्मारकाचे पावित्र्य सुरक्षित रहाणार नाही अशा ठिकाणी शिवस्मारक बांधण्यात येत असल्याने बऱ्याचशा शिवप्रेमींनी व सुज्ञ नागरिकांनी नाराजी व्यक्त करत शिवस्मारक हे योग्य ठिकाणी बांधण्यात यावेत अशी मागणी केली आहे. अशीच परिस्थिती वरखेडी येथील शिवस्मारक बांधकाम करतांना उद्धभवली असून आमच्या घरासमोर शिवस्मारक बांधण्यात येत असल्याकारणाने माझ्या वडीलांना मनस्थाप होऊन त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला असल्याची तक्रार वरखेडी येथील रहिवासी दिपक सोनार यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असून शिवस्मारकाच्या नियोजित जागेत बदल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की वरखेडी येथील आठवडी बाजारात शिवस्मारक बांधण्यात येत आहे. वरखेडी ग्रामपंचायतीने हे शिवस्मारक बांधण्यासाठी वरखेडी आठवडे बाजारातील रहदारीच्या महत्वाच्या ठिकाणी म्हणजे आठवडे बाजारातील रमेश त्र्यंबक सोनार यांच्या घरासमोर बाधण्याचा ठराव करुन या जागेवर लवकरच शिवस्मारक बांधण्यात येणार आहे. परंतु हे शिवस्मारक योग ठिकाणी बांधण्यात यावे अशी मागणी करत माझ्या घरासमोर शिवस्मारक बाधल्यास बाजारपेठेत रहदारीला अडथळा निर्माण होईल तसेच माझा मंडप, खुर्च्या व साऊंड सर्व्हिसचा व्यवसाय असल्याने मला मंडप, डेकोरेशन व इतर साहित्यांची वाहतूक करतांना चारचाकी वाहनातून करावी लागते जर माझ्या घरासमोर शिवस्मारक झालेच तर बाजपेठेत अडचणी व माझा व्यवसाय ठप्प होईल म्हणून हे स्मारक योग्य ठिकाणी बांधण्यात यावे अशी मागणी रमेश त्र्यंबक सोनार यांनी निवेदनाद्वारे केली होती.
परंतु ग्रामपंचायतीचे सरपंच व काही सदस्यांनी काहीएक एकुण न घेता आमच्या याच ठिकाणी शिवस्मारक बांधण्यात येईल अशी भुमिका घेतल्यामुळे आपला व्यवसाय ठप्प होईल व भविष्यात माझ्या मुलांचे काय हाल होतील या विवंचनेत त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला व माझ्या वडीलांना आज दवाखान्यात दाखल करावे लागले आहे तरी आमच्या घरासमोर बांधण्यात येणारे शिवस्मारक दुसरीकडे योग्य ठिकाणी बांधण्यात यावे असा विनंती अर्ज दिपक सोनार यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांच्याकडे केला आहे.
टिप ~ याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी सत्यजित न्यूज लवकरच वरखेडी सरपंच यांची भेट घेणार आहे.