लाख तांडा शिवारात २८ वर्षीय शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०४/२०२३
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथुन जवळच असलेल्या लाख तांडा येथील शेतकरी कैलास जयसिंग राठोड वय वर्ष (२८) हा शेतमजूरी शेतकरी शेतात बांधलेल्या गुराढोरांना आज दुपारी अंदाजे एक वाजेच्या सुमारास चारापाणी करण्यासाठी गेला असता त्याच्यावर बिबट्याने अचानकपणे हल्ला चढवून जबर जखमी केले हल्ला होताच कैलास न्या आरडाओरड केल्यामुळे आज पाचच्या लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली लोकांचा कलकला टाकून वाचले जखमी कैलासला ग्रामस्थांनी त्वरित पाचोरा येथील नगरपालिका दवाखान्यात नेले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
मागील महिन्यापासून या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा म्हणून कुराड लाख तांडा, सांगवी, साजगाव, बिल्धी, नांद्रा गावातील ग्रामस्थांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. परंतु वनविभागाचे अधिकारी या ग्रामस्थांच्या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष करत असल्याने वनविभागाबद्दल ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केली आहे.