नौशिन युनुस मन्यार याने माजी मुख्यमंत्री मा. श्री. उध्दव ठाकरे साहेबांना दिली अनोख्या चित्रकृतीची भेट.
श्री दिलीपजी जैन
दिनांक~२४/०४/२०२३
पाचोरा येथे काल दिनांक २३ एप्रिल २०२३ रविवार रोजी स्व. तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी आपल्या सगळ्याचे आवडते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. श्री. उध्दव ठाकरे साहेब हे पाचोरा येथील निर्मल सिडस येथे आले होते.
याप्रसंगी पाचोरा येथील शारदा इंग्लिश स्कूलचा इयत्ता सहावीत शिकणारा रंगश्री आर्टची विद्यार्थ्यांनी कुमारी नौशिन युनुस मन्यार याने स्वता (चित्रीत) रेखाटलेल्या हिंदू ह्रदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा भेट दिली या इतक्या कमी वयात स्वता रेखाटलेल्या प्रतिमेचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रतिमेच्या वरच्या बाजूला श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुबक असा फोटो काढला असून बाजूलाच खाली माजी मुख्यमंत्री मा. श्री. उध्दव ठाकरे साहेबांचा फोटो खालच्या बाजूला डावीकडे सौ. वैशालीताई सुर्यवंशी व उजवीकडे स्व. तात्यासाहेब आर. ओ. पाटील. यांचा फोटो रेखाटला असून ही प्रतिमा दोन फुट रुंद व अडीच फुट उंचीची आहे.
कुमारी नौशिन मन्यार हीला भविष्यात मुंबई येथील जगप्रसिद्ध जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथे कलेचे उच्च शिक्षण घेण्यासाठीचा मनोदय असल्याचे सांगत मला श्री. गो. से. हायस्कूलचे कला शिक्षक मा. श्री. सुबोध कांतायन याचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असल्याचे सांगितले.