उद्या सकाळी दहा वाजता शिवसेना,भाजपा, रिपाई, पीआरपी, महायुतीचा सहकार मेळाव्याचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०४/२०२३
पाचोरा, भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शेतकरी विकास पॅनल म्हणजेच शिवसेना, भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, पी. आर. पी. महायुतीच्या मेळावा बुधवार दिनांक २६ एप्रिल बुधवार रोजी ठीक १०.०० वाजता तुळजाई जिनिंग,मोंढाळा रोड, पाचोरा येथे आयोजित केला आहे.
या मेळाव्याला पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील, खासदार उन्मेषदादा पाटील, आमदार आबासो. चिमणराव पाटील, आमदार राजू मामा भोळे, आमदार किशोर अप्पा पाटील. हे मान्यवर उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी सदस्य व ग्रापंचायत सदस्य यांनी उपस्थिती द्यावी अशी विनंती
शिवसेना जिल्हा प्रमुख,जळगाव रावसाहेब मनोहर पाटील, मधुकर पाटील (काटे) जिल्हा सरचिटणीस:भाजपा जळगाव यांनी केली आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे तसेच कार्यक्रमा नंतर स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.