सुरबंगला पोलिस स्टेशन हद्दीत अपघातात पाचोरा तालुक्यातील पिंप्री येथील दोन ठार एक जखमी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०२/२०२२
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथून जवळच असलेल्या डांभुर्णी गावाजवळील पिंपरी येथील संदीप सुनिल बेलदार, राजु हशेन तडवि, रहेमान महंमद तडवि हे काही कामानिमित्त दुचाकीवर औरंगाबाद जिल्ह्यात गेले होते.
परंतु घराकडे परततात असतांनाच पिशोर गावाजवळ व सुरबंगला पोलिस स्टेशन हद्दीत त्यांची दुचाकी व समोरून ऊसाने भरलेला ट्रक येत असतांना यात जोरदार धडक झाली व या अपघातात संदीप सुनील बेलदार व राजु हुशेन तडवी हे जागीच ठार झाले व रहेमान महंमद तडवी जबर जखमी झाला आहे.
घटनेची माहिती सोशल मिडीयाव्दारे मिळताच पिंप्री गावात एकच गोंधळ उडाला सदर घटनेची माहिती दिलीप जैन यांनी माजी जिल्हापरिषद सदस्य मा.श्री. उध्दव भाऊ मराठे यांंना दिली. माहिती मिळताच मा.श्री. उध्दव भाऊ मराठे यांनी पाचोरा येथून पिंप्री येथे येऊन रणजित दादा व अपघातातील मयत व जखमींच्या नातेवाईकांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली आहे.
(सविस्तर बातमी उद्या.)