चिंचपूरा येथील मा.श्री. सचिन कोकाटे यांना कु्षीभूषण पुरस्कार जाहीर

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/११/२०२०
राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे चिंचपूरा तालुका पाचोरा येथील सचिन कोकोटे यांना कुषीभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
सचिन कोकोटे यांचे चिंचपुरे येथे कुषी केंद्र असून ते शेतकऱ्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करीत आहेत. ते कुषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे पाचोरा तालुकाध्यक्ष आहेत. तसेच पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे नोंदणी सदस्य आहे. गजानन ग्यान यांचे म्हसावद (ता.जळगाव) येथे कुषी केंद्र असून ते सुद्धा आवश्यक त्या विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे. ते कु्षी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे जामनेर तालुकाध्यक्षपदी देखील कार्यरत आहेत. प्रगतीशिल शेतकरी राहुल सूर्यवंशी यांनी त्यांच्या शेतात पीक पद्धतीत विविध नावीन्यपूर्ण प्रयोग करुन विक्रमी उत्पादन घेतले. अरबी लागवडीचा धाडसी निर्णय घेवून त्यात ते यशस्वी ठरले. त्यांची यशोगाथा अन्य शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरतेय. कोकोटे व ग्यान यशस्वी उद्योजक ठरताय. तर सूर्यवंशी हे अरबीचे यशस्वीरित्या उत्पादन घेवून शेतकऱ्यांसमोर एक नवीन पिकाबाबत पर्याय निर्माण करीत आहेत. या उल्लेखनीय कार्याची दखल घेवून त्यांना पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते लवकरच करण्यात येईल, असे संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ यांनी कळविले आहे.