पाचोरा~भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १०० कोटीचे अनुदान. आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/१०/२०२१
यावर्षी नेमके रब्बी हंगाम हातातोंडाशी येण्याच्या कालावधीत अवकाळी पावसाने कहर केल्यामुळे पाचोरा-भडगाव मतदार संघात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. तसेच आता खरीपाचा हंगाम हातातोंडाशी येणार तेव्हाच निसर्गाचा कोप झाला व अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामी पिके होत्याची, नव्हती झाली.
या नैसर्गिक संकटात शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला होता. त्या पार्श्वभूमीवर पाचोरा, भडगाव तालुक्याचे आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांनी मुख्यमंत्री मा.श्री. उध्दव साहेब ठाकरे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याबाबत पाठपुरावा केला.
त्याची फलश्रुती म्हणुन राज्य शासानने रब्बी व खरीप या दोन्ही हंगामासाठीच्या नुकसानभरपाई करीता शेतकऱ्यांना शंभर कोटी रुपयांची मदत जाहीर करून प्रत्यक्ष वाटपाला ही सुरवात झाली असल्याची माहिती आमदार मा.श्री. कीशोर आप्पि पाटील यांनी आज पत्रकार परीषदेत दिली.
माहिती देतांना आमदार मा.श्री. कीशोर पाटील पुढे म्हणाले की, रब्बी हंगामात मार्च महीन्यात भडगाव, पाचोरा तालुक्यात मोठ्याप्रमात नुकसान झाले होते. त्यावेळी मी स्वताहा शेतकऱ्यांच्या शेतमालाची झालेली दयनीय अवस्था व व्यथा पाहीली आहे.
तरीही माझा शेतकरी खचून न जाता सगळे दुख्ख विसरून उधार, उसनवारी करत पुन्हा खरीप हंगाम उभा केला. मात्र पुन्हा ऑगस्ट ते ऑक्टोबर महीन्यात अतिवृष्टीत पाचोरा-भडगाव तालुक्यातील खरीप हंगाम पुर्णतः पाण्यात बुडाला. कापुस, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी केलेला खर्च निघणेही मुश्किल झाल्याची परिस्थिती व हतबलता मी स्वतः पहातांना मला अवघड झाले होते.
म्हणून मी फेसबुकच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधला व भरीव मदत मिळवून देण्याचे वचन दिले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.श्री.अजितदादा पवार, नगर विकास मंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री मा.श्री. विजय वडेट्टीवार, कृषी मंत्री मा.श्री. दादा भुसे यांची भेट घेऊन तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री. गुलाबराव पाटील यांच्या समवेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एसडीआरएफच्या नीकसाच्या तीनपट नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली होती.
त्यावर मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तसेच रब्बी हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने शेतकऱ्यांना द्यावी ही मागणी सतत लावून धरली. मुख्यमंत्र्यांनी परिस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेत फक्त चार दिवसात रब्बी हंगामाच्या नुकसानीची मदत जाहीर केली. तसेच अतिवृष्टीची पुर्वीच्या निकषापेक्षा अधिकची मदत जाहीर केली.
(रब्बी’ चे १९ कोटी अनुदान)
रब्बी हंगामाच्या नुकसानीपोटी जळगाव जिल्ह्याला ३५ कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले असून. पैकी तब्बल १९ कोटी ५० लाख रुपयांचे अनुदान भडगाव- पाचोरा या तालुक्यांना मिळाले त्यातील १८ कोटी रुपये एकट्या भडगाव तालुक्याला तर पाचोरा तालुक्याला १ कोटी ३१ लाख रुपये एवढे अनुदान प्रत्यक्ष प्राप्त झाले आहे.
या अनुदान वाटपाचे काम महसूल प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरु असून दिवाळीपूर्वी ही अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तसेच पाचोरा भडगाव मतदार संघाला ५० टक्क्या पेक्षाही अधिक अनुदान मिळवण्यात यश आले असून याचे मोठे समाधान असल्याचे आमदार मा.श्री. किशोर पाटील यांनी सांगीतले.
(खरीपाला मिळणार ८० कोटी)
ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान पाचोरा भडगाव तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना साधारणपणे ८० कोटी रुपयाचे अनुदान मिळणार आहे. त्यात पाचोरा तालुक्याला ५० कोटी तर भडगाव तालुक्याला ३० कोटी रुपयांचे अनुदान मिळण्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत शासनाने कालच निर्णय जाहीर केला असून लवकरच दोन-चार दिवसात तेही अनुदान प्रत्यक्षरीत्या त्या-त्या तालुक्यांना प्राप्त होईल.
अनुदान प्राप्त होताच हे अनुदान जलद गतीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे. म्हणून शेतकऱ्यांची दिवाळी निश्चितपणे आनंदात जाईल याची मला खात्री आहे. मी सतत पाठपुरावा करुन शेतकऱ्यांना ऐन दिपावलीचे सणानिमित्त वेळेवर नुकसानभरपाई मिळवून देऊ शकलो याचा मला आनंदही असल्याचे आमदार कीशोर पाटील यांनी सांगत माझ्या पाठपुराव्याला राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंत्रीमंडळाने साथ देत वेळेवर अनुदान उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले आहेत.