अन मुख्यमंत्री स्वत:ची पाठ थोपटण्यात मग्न आहेत ; गिरीश महाजनांची राज्य सरकारवर टीका.

थोपटण्यात मग्न आहेत ; गिरीश महाजनांची राज्य सरकारवर टीका
tdadmin by tdadmin August 10, 2021
…म्हणूनच मराठा आरक्षण गेले ; गिरीश महाजनांचा आरोप
ADVERTISEMENT
Spread the love
जळगाव (प्रतिनिधी): भाजप नेते गिरीश महाजन यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट शब्दांत निशाणा साधला आहे.
‘महाविकास आघाडी सरकार मधील तिन्ही पक्ष श्रेयवादाच्या लढाईत राज्याचे नुकसान करत आहेत. शासनाच्या तिजोरीत ठणठणाट असून गेल्या दोन वर्षांत राज्यात कुठलीही ठोस कामे झालेली नाहीत. काही भागात पूरग्रस्त परिस्थिती तर काही ठिकाणी दुष्काळाचे सावट असल्याने जनता हवालदिल झाली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टीव्हीवर भूलथापा मारून स्वत:चीच पाठ थोपटवून घेण्यात मशगूल आहेत’, अशा शब्दात भाजप नेते, आमदार गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. जळगाव जिल्हा भाजपच्या वसंत स्मृती या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुढे बोलताना ते महाजन म्हणाले, ‘जळगाव जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांना भाजप सरकारच्या काळात परवानगी मिळाली होती. ती कामे सुरू देखील झाली होती. मात्र अनेक धरण प्रकल्पांची सुरू असलेली कामे या सरकारने बंद पाडली. ९० टक्के काम झालेल्या वाघूर धरणासाठी सध्याच्या सरकारने रुपयाचा सुद्धा निधी न दिल्याने ४५ हजार एकर शेती सिंचनापासून वंचित राहिली आहे. राज्यातील अपूर्ण प्रकल्पांची अशीच अवस्था आहे.
ADVERTISEMENT
जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागात पैसाच नसल्याने कुठलीही कामे झाली नाहीत. त्यामुळे हा विभाग अस्तित्वात आहे की नाही? अशी अवस्था झाली असल्याचा आरोप आमदार महाजन यांनी केला. हे महाविकास आघाडी सरकार नसून बिघाडी सरकार आहे. आतापर्यंतचं सर्वात अपयशी सरकार राज्याला मिळालं असून भूलथापा मारण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. लोकप्रिय म्हणवून घेणारे मुख्यमंत्री स्वत:ची पाठ थोपटवून घेण्यात धन्यता मानत आहेत