पत्नीचा खुन करुन, गळफास घेत नवऱ्याने केली आत्महत्या. पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथील घटना.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/१०/२०२१
सद्यस्थिती सगळीकडे वेगवेगळ्या घटना घडत आहेत व ऐकावयास येत आहेत. आजच्या या धावपळीच्या परंतु प्रगत युगात विपरित घटनाक्रम दिवसेंदिवस वाढतच असून आपण बौध्दिक, भौगोलिक व आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करत असतांनाच, आहे त्या परिस्थितीत समाधान न मानता मात्र सुख शोधण्यासठीच्या नव्हे तर नाविलाजास्तव (भोगण्यासाठीच्या) हव्यासापोटी असे म्हटले तर वावगे ठरणार नाही असे वागून लाखमोलाचे मानवी जीवन संपवत आहोत.
अशीच एक घटना पाचोरा तालुक्यातील सावखेडा बुद्रुक येथे नुकतीच घडली आहे. सावखेडा येथील सतीश धनसिंग परदेशी व गायत्री सतीश परदेशी हे तरुण विवाहित सर्वसामान्य कुटुंबातील दांपत्य त्यांच्या संसर वेलीवर एक मुलगा व एक मुलीच्या रुपाने बहरलेली दोन गोंडस फुलं सतीश हा कधी कटलरी तर कधी भाजीपाला व्यवसाय करुन आपल्या संसाराचा गाडा ओढायचा परंतु यातच काही दिवसापूर्वी त्याला मानसिक आजाराने ग्रासले या कारणांमुळे त्याची बौध्दिक क्षमता मंदावली थोडक्यात त्याला बुध्दिभ्रमा सारख्या लक्षणांनी वेढले होते व त्याच्यावर उपचार सुरु होते मात्र आर्थिक परीस्थीती बिकट असल्याकारणाने मध्यंतरीच्या काळात सतीशचा औषधोपचार थांबला असल्याने तो मानसिक तणावाखाली होता असेही जनमानसातील चर्चेतून बोलले जात आहे.
नेमके यातच मागील काही दिवसांपूर्वी सतीशच्या वडीलांचे वृद्धापकाळाने व अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले या कारणास्तव आपण पोरके झाल्याचा भास होऊन सतीशच्या मनावर अजूनच दडपण वाढले होते. याच निराशेने जीवन जगू लागला याच निराशेत अगोदरच मेंदू विकाराने त्रस्त असलेल्या सतीशने गुरुवार रात्री ते शुक्रवार सकाळ पर्यंतच्या कालावधीत स्वतःच्या पत्नीचा गळा आवळून खून केला व स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची चर्चा सावखेडा गावात सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये यांनी घटनास्थळी भेट देऊन सतीशचा मृतदेह पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी पाचोरा येथे पठववला असून घटनेचा तपशील जाणून घेण्यासाठी सावखेडा येथे थांबून आहेत. तसेच घटनेची माहिती मिळताच पाचोरा डी.वाय.एस.पी.मा.श्री. भरतजी काकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पिंपळगाव पोलिसांना योग्य त्या सुचना देत पुढील तपास सुरू केला आहे.
(बातमी लिहून होईपर्यंत पोलिस तपास सुरु होता म्हणून सविस्तर खुलासा पुढील बातमीने)