कुऱ्हाड येथील अवैधधंदे वाल्यांची समझौता बैठक सुरु.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/१०/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड हे गाव अवैधधंद्याचे माहेर घर ठरत आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण कुऱ्हाड गावात सट्टा, पत्ता,जुगार,अवैध दारु गाळणे व विकणे तसेच देशी दारुची अवैध विक्री हे व्यवसाय राजरोसपणे सुरु होते. या अवैधधंद्यामुळे अल्पवयीन मुले व्यसनाच्या आहारी जात असून गावात व्यसनाधीनता वाढून अशांतता निर्माण झाली होती. तसेच व्यसनापायी बरीचशी कुटुंब बर्बाद झाली असून काही बर्बादिच्या मार्गावर आहेत.
त्यातच भरीत भर म्हणून जामनेर व पाचोरा तालुक्यातील दोघं सट्टा किंगच्या व्यवसायाची स्पर्धा वाढून या दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. व यातूनच भांडणे सुरु झाली होती. या कारणास्तव कुऱ्हाड गाव परिसरात अशांतता निर्माण होऊन सर्वसामान्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याची दखल घेत सत्यजित न्यूजने
वृत्त प्रकाशित केले होते.
हे सेक्स
तसेच अवैध धंद्यांना वैतागून काही ग्रामस्थ व महिलांनी सत्यजीत न्यूजकडे गाऱ्हाणे मांडले होते. त्या अनुषंगाने सत्यजीत न्यूजने या शिर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले होते तसेच पिंपळगाव हरेश्वर पोलिसांशी संपर्क साधून अवैधधंदे बंद करण्यासाठी साकडे घातले होते. यामुळे पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भोये साहेबांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेत कारवाईचा बडगा उगारून अवैधधंदे करणारांना सळो की पळो करुन सोडले होते.
परंतु यापुढे जाऊन वैध धंदे करणार्यांनी पोलिसांवर पाळत ठेवण्यासाठी गुप्त खबऱ्यांची नेमणूक करून आपले अवैधधंदे सुरू ठेवले आहेत. विशेष म्हणजे गावात मोबाईल वरून तसेच गावात फिरून चालती, फिरती सट्टा बिटिंग घेतली जात असून दारू विक्री करणारे घरपोच दारू पुरवठा करत असल्याचे खात्रीलायक समजते.