एकच ध्यास गावाचा विकास हे ब्रिद घेऊन कळमसरा ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत ग्रामविकास परिवर्तन पॅनलची प्रचारात आगेकुच
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०१/२०२१
ग्रामपंचायत कळमसरा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव पंचवार्षिक निवडणूक २०२१ ते २०२५ च्या ग्रामपंचायत निवडणूकीत ग्रामविकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवत परिवर्तन पॅनलने जनतेसमोर आपला जाहीरनामा जनतेसमोर ठेवत सन्माननीय गावकरी मतदार बंधु भगिनींना संक्रांतीच्या शुभेच्छा देत संक्रांत निमित्ताने रोडरोलर, गँस सिलेंडर व कपबशीच्या चिन्हावर आपले बहुमोल मतदान करुन आम्हाला विजयी करा व हीच आमच्या पॅनलसाठी संक्रांत भेट असेल व आम्ही पुढील पाच वर्षात तुमच्या मतदानरुपी कर्जाची परतफेड विविध योजना, सोयी, सुविधा देऊन करु असे मत व्यक्त केली आहे.
जाहीरनाम्यात गावाच्या चारही बाजूला व श्रीराम नगर प्लॉट मध्ये महिलांसाठी अत्याधुनिक स्वच्छालय बनवणे,
गावातील रस्ते कॉंक्रिटीकरण व सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी नाली बांधकाम करणे तसेच भूमिगत गटारीचे बांधकाम ग्रामविकास विभागाच्या १५/२५ योजनेअंतर्गत मंजूर करून बांधकाम करणे.
गावातील तरुण मुलांसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री सहित सुसज्ज अशी व्यायामशाळा बांधणे.
तरुणांसाठी सुसज्ज वाचनालय उभारुन स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व अभ्यासासाठी अभ्यासवर्ग सुरु करुन स्पर्धा परिक्षेसाठी लागणारी पुस्तके उपलब्ध करून देणे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला वॉल कंपाऊंड करणे व पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करणे.
गावातील पाणीपुरवठा योजनेच्या जीर्ण झालेल्या टाकीचे नवीन बांधकाम करणे.
सर्व गावात शुद्ध पाण्याच्या व्यवस्था करणे.
भोगवटादार व्यक्तीच्या नावे मालकी हक्कामध्ये घर बांधण्यासाठी मंत्रालय स्तरावरून मंजुरी मिळवणे.
हटकर धनगर समाजातील लाभार्थ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत घरकुल चा लाभ देणे.
अनुसूचित जाती नवबौद्ध लाभार्थ्यांसाठी रमाई आवास योजनेअंतर्गत जागा मंजूर करून घरकुल मंजूर करणे.
भिल्ल,पारधी समाजातील लाभार्थ्यांना शबरी घरकुल योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळवून देणे.
अल्पसंख्यांक योजनेअंतर्गत मुस्लिम बांधवांसाठी घरकुल मंजूर करणे.
भोई समाज बांधवांसाठी एन.सी.बी. कोट्यातून घरकुल योजनेचा लाभ मिळवून देणे तसेच भोई समाज विकास मंडळाकडून मासेमारी साहित्य मत्स्यबीज उपलब्ध करून देणे.
जनरल यादीतील बहुप्रतीक्षित लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा मंजूर करून घरकुलाचा लाभ मिळवून देणे.
कृषी विभागांतर्गत वाटप करण्यात येत असलेले एच.डी. पाईप फवारणी यंत्र, मळणी यंत्र, पिटर मशीन, मिनी ट्रॅक्टर अल्पभूधारक लाभार्थ्यांना मिळवून देणे.
जनरल सर्वसामान्य लाभार्थ्यांना अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेअंतर्गत विहीरींचा लाभ मिळवून देणे.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जलसिंचन विहीरीचा लाभ देणे.
कुंभारखान गावात रस्ता कॉंक्रिटीकरण व शुद्ध पाणी पिण्याची सोय करणे.
अल्पसंख्यांक विकास योजनेअंतर्गत मुस्लीम बांधवांसाठी रस्ता कॉंक्रिटीकरण व पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे.
गावातील सुशिक्षित मेहनती मुलांसाठी पोलीस भरती आर्मी भरती चे मार्गदर्शन वर्ग सुरू करणे.
साठ वर्षे वयाच्या वरील वृद्ध श्री, पुरुषांना राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देणे.
गावातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी मुद्रा लोन महात्मा फुले विकास महामंडळ संत रोहिदास मंडळ अण्णाभाऊ साठे विकास मंडळ यांच्याकडून व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणे.
१४ व्या वित्त आयोग अंतर्गत गावातील चौकाचौकात पेव्हर ब्लॉक बसविणे.
१५ व्या वित्त आयोग निधीतून जि.प. शाळा अंगणवाड्या डिजिटल करणे.
गावाच्या बाहेर गावांतर्गत एल.ई.डी. बल्ब असणे.
गावातील आडांची (गावविहीरी) दुरुस्ती करून त्यातील पाणी
जलशुद्धीकरण करून पिण्यायोग्य बनवणे.
दिव्यांग अपंग बांधवांना व्हीलचेअर, मोटर सायकल बनवून देणे.
तसेच दिव्यांग कोट्यातून घरकुलाचा लाभ मिळवून देणे.
कळमसरा ते कुंभारकाम रस्ता ठक्कर बाप्पा योजना अंतर्गत निधी मंजूर करून रस्ता तयार करणे.
असे जाहीर केले असून आपले अमुल्य असे मतदान करून सेवेची संधी द्याल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.