सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • अनफिट, नादुरुस्त स्कूलबसमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, प्रादेशिक महामंडळाकडून कारवाई अपेक्षित.

  • कायद्याची राहिली नाही भीती, गोळीबार करणाऱ्या आरोपींची जामनेर पोलीसांकडे शरणागती.

  • पाचोरा बसस्थानक गोळीबारातील जखमी आकाश मोरेचा जागीच मृत्यू.

  • पाचोरा बसस्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार, एक गंभीर जखमी.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्कूलबस व दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार गंभीर जखमी.

Uncategorizedक्राईम जगत
Home›कृषी विषयक›Uncategorized›रेशनिंगचा तांदूळ पकडला यावल तालुक्यात मात्र घबराट होतेय पाचोरा तालुक्यात. सखोल चौकशी व थेट कारवाईची मागणी.

रेशनिंगचा तांदूळ पकडला यावल तालुक्यात मात्र घबराट होतेय पाचोरा तालुक्यात. सखोल चौकशी व थेट कारवाईची मागणी.

By Satyajeet News
October 30, 2021
1637
0
Share:
Post Views: 188
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/१०/२०२१

धुळे व जळगाव जिल्ह्यातील रेशन माफियांचे सर्वात मोठे रॅकेट चोपड्यातून सक्रीय असल्याचे उघड झाले असून चोपड्याचे पंकज वाणी यांच्यासह अन्य चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई कापडणे-चोपडा-यावल मार्गे काळाबाजारात शासकीय रेशनिंगचा ३० टन तांदूळ चोरट्या मार्गाने नेताना यावल पोलिसांनी पकडून ट्रक ताब्यात घेत याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात ट्रक चालकासह अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत यावल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाचा शिधापत्रिकेवर वितरित होणारा तांदूळ काळ्याबाजारात जास्त दराने विक्री करणारा ट्रक चोपडा-यावल मार्गे गोंदिया येथे जात असल्याची गोपनीय माहिती यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहिती २३ ऑक्टोबर रोजी दुपारी मिळाली.त्यानुसार यावल पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार मुझफ्फर खान समशेर खान, पोलीस हेडकॉन्स्टेबल असलम खान, चालक रोहिल गणेश,पोलीस कॉन्स्टेबल सुशील घुगे यांच्यासह अन्य पथक हे यावल-चोपडा रोडवर असलेल्या हॉटेल केसर बागजवळ तपासणीसाठी थांबले.दुपारी तीन वाजेच्या सुमारास तांदुळाने भरलेला ट्रक क्रमांक (एमएच १८ एसी ८४७) येताना दिसून आला.यावेळी यावल पोलिसांनी ट्रकला थांबवून तपासणी केली असता. त्यात ५ लाख ८८ हजार रुपये किमतीचा रेशनिंगच्या तांदूळ असल्याचे आढळून आले.यासंदर्भात ट्रक चालकाने उडवाउडवीचे उत्तर दिली.

त्याची कसून चौकशी केली असता हा तांदूळ पंकज मुरलीधर वाणी रा.चोपडा यांच्या सांगण्यावरून संतोष प्रभाकर पाटील, निलेश राजेंद्र जैन रा. कापडणे ता.जि.धुळे यांच्या कापडणे येथील गोडाऊन मधून ३० टन तांदूळ भरून भंडारा येथील गितीका पराबोलिक इंडस्ट्रीज भंडारा येथे जात असल्याचे सांगितले.यासंदर्भात यावल पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन यावल पोलिसात जमा करण्यात आला आहे तर ट्रकचालक केदार मुरलीधर गुरव (वय-३८) रा. आकाश गार्डन समोर, शहादारोड, शिरपुर याला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान पोलिसांनी कापडणे येथील कल्याणी विनायक इंडस्ट्रीज येथील गोडाऊनला भेट दिली असता त्या ठिकाणी शासनाचे वापरण्यात येणारे बारदान आढळून आले आतापर्यंत गेल्या दोन महिन्यात १७० टन तांदूळ काळाबाजारात विक्री केला असल्याची माहिती समोर आली आहे.तपास योग्य दिशेने पुढे गेल्यास चोपडा शहरातील अजून काही मोठी नाव समोर येतील अशी चर्चा चोपडा शहरात रंगली आहे जिल्ह्यात होणारा रेशन तस्करीचे सर्व सूत्र ही चोपडा येथून हलवली जात असल्याची चर्चा होत आहे.

याबाबत सहाय्यक फौजदार मुझफ्फर खान समशेर खान यांच्या फिर्यादीवरून पंकज मुरलीधर वाणी रा. चोपडा, निलेश राजेंद्र जैन, संतोष प्रभाकर पाटील दोन्ही रा.कापडणे ता.जि.धुळे आणि केदार मुरलिधर गुरव रा. शिरपूर जि. धुळे या चार जण विरोधात यावल पोलिस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ (कलम३व७)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश राजेंद्र जैन,संतोष प्रभाकर पाटील दोन्ही जणांना अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील करीत आहेत.

यावल तालुक्यातील ही मोठी कारवाई सुरु असतांनाच पाचोरा तालुक्यातील एक सक्षम अधिकारी व पाचोरा तालुक्यातीलच काही रेशनिंग दुकानदार यांचे भ्रमणध्वनी सतत खणखणत होते. तसेच पाचोरा तालुक्यातील काही रेशनिंग दुकानदारांचे व रेशनिंग वाटपात घोळ करुन धान्याची हेराफेरी करुन काळ्या बाजारात विकणारे व दलालांचे भ्रमणध्वनी तासंतास संभाषणात व्यस होते. अशी जोरदार चर्चा सुरू असून पाचोरा तालुक्यातही मोठ्या प्रमाणात रेशनिंगचा तांदूळ काळ्याबाजारात विकला जात असल्याने रेशन माफियांनी धसका घेतला असून काहिंचे भ्रमणध्वनी कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असल्याचे सांगितले जात आहे.

१)
वरखेडी गाव परिसरातील विद्यूतपुरवठा खंडित करणारा हा कोण ?

वरखेडी गाव परिसरातील विद्यूतपुरवठा खंडित करणारा हा कोण ?

२)

जळगाव जिल्ह्यातील काही धान्य माफियांवर विदर्भात कारवाई झाल्याची जोरदार चर्चा. सखोल चौकशी झाल्यास अजून काही मासे गळाला लागण्याची शक्यता.

जळगाव जिल्ह्यातील काही धान्य माफियांवर विदर्भात कारवाई झाल्याची जोरदार चर्चा. सखोल चौकशी झाल्यास अजून काही मासे गळाला लागण्याची शक्यता.

सत्यजित न्यूजने याअगोदर पाचोरा तालुक्यात रेशनिंगचा काळाबाजार सुरु असल्याबाबत वारंवार आवाज उठवला होता परंतु पाचोरा तालुक्यातील स्वस्त धान्य वाटपात (हमाम मे सब नंगे) अशी परिस्थिती असल्याकारणाने सक्षम अधिकारी व लोकप्रतिनिधींनी गांधीजींच्या तिन माकडा सारखी भुमिका घेत अप्रत्यक्षपणे रेशन माफियांना अभय दिल्याचे अनुभवायला येत आहे.

म्हणून आतातरी यावल प्रकरणाची सखोल चौकशी होऊन कारवाई झाल्यास नक्कीच पाचोरा व जामनेर तालुक्यातील मोठे मासे गळाला लागतील यात शंका नाही.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

शेंदुर्णी नगरपंचायत सफाई कर्मचारी संपावर, नागरिकांचे आरोग्य ...

Next Article

पाचोरा विज वितरण कंपनीच्या विभागिय कार्यालयात कॉंग्रेसची ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    गाळ्यांची लिलाव प्रक्रिया नियमानुसारच; जिल्हाधिकाऱ्यांच्या निकाल; तक्रार अपील फेटाळले

    September 18, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    श्री. उध्दवभाऊ मराठे व सौ.कांताबाई मराठे. कोरोना पॉझिटिव्ह.

    March 6, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    लोहारी ते पाचोरा दरम्यान रस्त्यावर दुचाकीस्वारास लुटण्याचा प्रयत्न.

    December 4, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी भुषण कुंटे यांची नियुक्ती.

    July 3, 2025
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    सोयगाव तालुक्यातील विरप्पनचा पाचोरा तालुक्यात धुमाकूळ, दररोज होतेय शेकडो हिरव्यागार वृक्षांची कत्तल.

    January 29, 2025
    By Satyajeet News
  • Uncategorized

    मुक्ताईनगर पोलीस स्टेशन तर्फे जनप्रबोधन एक ध्यास दक्ष नागरिक जनजागरण.

    November 15, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • आरोग्य

    पाचोरा तहसील कार्यालयासमोर हरीभाऊ पाटील उद्यापासून उपोषणाला बसणार.

  • ब्रेकिंग न्यूज

    भररस्त्यावर वाळूचा ढिग टाकल्याने अपघाताची शक्यता, महसूल प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा.

  • आरोग्य

    कु.पल्लवी जोहरे सोयगाव मधील पहिल्या महिला M.B.B.S.डॉक्टर.

दिनदर्शिका

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज