शेंदुर्णीत दुर्गामाता दौंडमुळे नवरात्रोत्सवात नवचैतन्याची लहर.

देवेंद्र पारळकर. शेंदुर्णी.(जामनेर)
दिनांक~०२/१०/२०२२

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी शहरात श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित श्री. दुर्गामाता दौडला युवक, युवती महिलांचा मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने नवरात्सोत्सवात यामुळे नवचैतन्य निर्माण झाले आहे.

श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतुन व गुरुवर्य संभाजी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही दौंड करत असतात. या दौंड मध्ये अग्रभागी भगवा ध्वज हाती घेऊन पारंपरिक वेशभुषा परिधान करत राष्ट्र भक्तीने प्रेरित होत जयघोष करत ही दौड वाडी दरवाजा याभागातुन शहरातील विविध नवरात्रोत्सव मंडळाच्या ठिकाणी जाऊन देवीची आरती व दर्शन करतात. जागोजागी या भगव्या ध्वजाचे महिलांच्या वतीने पुजन करण्यात येत असते.

अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे घटस्थापना ते अश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजया दशमी पर्यंत शहरातील विविध भागातुन पहाटे ही दौड काढली जात आहे. ही दौड काढण्याचा मुळ उद्देश असा की, संपुर्ण नवरात्रोत्सव काळात भल्या पहाटे सर्व हिंदु बांधव आपल्या झोपेचा त्याग करून आई भवानीची आपल्या देवीची भक्तीमय उपासना करत असतात. जातीजातीत विभागलेला हिंदु समाज भगव्या ध्वजाखाली एकत्र येऊन आई भवानीची शक्तीमय उपासना करत असतात यामुळे नवरात्सोत्सवात भक्तीमय चैतन्य निर्माण होत एकोपा वाढीस लागत आहे.

ब्रेकिंग बातम्या