पाचोरा येथे शिवरायांचा उदय हे पुस्तक वाटप करून केली शिवजयंती साजरी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०२/२०२२
अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असंख्य तरुणांचे हृदय स्थान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ रोजी CMS- छत्रपती मराठा साम्राज्य ऑर्गनायझेशन पाचोरा/भडगाव टीम तर्फे शिवरायांचा उदय हे पुस्तक वाटप मोहीम राबविण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नाचून नव्हे तर वाचून साजरी होणे गरजेचे आहे. कारण अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेणे गरजेचे आहे व ते वाचल्याशिवाय समजणार नाही. म्हणून नव्या पिढीला व मुलांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रवासा बद्दल माहिती व्हाव्ही म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला , आपल्या उपक्रमाला खूप चंगला असा प्रतिसाद मिळाला तरी मी सर्व उपस्थितती लावलेल्या मराठा बांधवांचे आभार मानतो.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे जयंती उत्सवाच्या निमित्ताने एक दिवसासाठी अंगात आणण्यापेक्षा यांचे विचार आयुष्यभर डोक्यात घेऊन आपण त्याप्रमाणे वागलो तरच या जयंती साजरी करण्यामागचा खरा हेतु साध्य होईल. अन्याय, अत्याचार, व्यसनाधीनता हे आपोआपच नष्ट होतील असेही मत वक्त्यांनी व्यक्त केले.
आजच्या या उपक्रमाला CMS-पाचोरा/भडगाव टीमचे सदस्य ,रवी भाऊ देवरे , गौरव चव्हाण , किशोर मोरे, ताईसो मंगल गोडसे, मनीष बोरसे, रावसाहेब पाटील , सुधीर सर गोडसे , डॉ. नरेश गवांदे,चेतन पाटील सर, अभिजित काटकर , निलेश पाटील , तुषार पाटील ,वर्षा रावसाहेब बोरसे,श्री विकास पाटील सर,प्रशांत पाटील आणि इतर कार्यकारी पदाधिकारी यांनी उपस्थित उपस्थिती लावली.लहान मुलांना पुस्तक वाटप करून एका अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली व त्यासाठी सर्व शिवप्रेमींनी परिश्रम घेतले.