विद्यूत बिल भरुन सुध्दा ट्रान्सफॉर्मर मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले असून उप कार्यकारी अभियंता राठोड यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणे पुसल्याचा आरोप केला असून येत्या दोन दिवसात ट्रान्सफॉर्मर न मिळाल्यास आंदोलन छेडणार असल्याचे
आंबे वडगाव येथील सरपंच वसत पवार व शेतकऱ्यांनी दिला आहे.
पाचोरा तालुक्यातील आंबे वडगाव येथील शेतकऱ्यांनी शेतीपंपाचे विद्युत बिल भरल्यावर सुद्धा त्यांना ट्रांसफार्मर (डीपी ) देण्यासाठी मागील सहा महिन्यापासून पाचोरा येथील उपकार्यकारी अभियंता राठोड साहेब हे टाळाटाळ करत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
यात महत्त्वाचे म्हणजे अतिवृष्टी झाल्यामुळे शेतातील विहिरी तुडुंब भरल्याने या विहिरीतील पाणी ओसांडून वाहत असल्याने विहिरीच्या पाण्याचा उपसा करण्यासाठी विद्यूत पंप चालवणे गरजेचे आहे मात्र विद्यूतपूरवठा खंडित असल्याने शेतातून पाणी वाहून पिकांचे नुकसान होत आहे.
तसेच या ट्रांसफार्मर वर आंबे वडगाव खुर्द, वडगाव बुद्रुक, या गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे सुद्धा कनेक्शन असल्याने विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प झाली असून ग्रामस्थांना अशुद्ध पाणी पिऊ दिवस काढावे लागत आहेत.
या शेतकऱ्यांना त्वरित ट्रान्सफॉर्मर देण्यात यावा याकरिता पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी कार्यकारी अभियंता राठोड यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्वरीत ट्रान्सफॉर्मर देण्यासाठी सांगितले होते परंतु अद्यापही ट्रान्सफॉर्मर देण्यात आलेला नसल्याने संबंधित मुजोर अधिकाऱ्याला जबाबदार धरुन शेत मालाचे झालेले नुकसान भरुन मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली