सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • अनफिट, नादुरुस्त स्कूलबसमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, प्रादेशिक महामंडळाकडून कारवाई अपेक्षित.

  • कायद्याची राहिली नाही भीती, गोळीबार करणाऱ्या आरोपींची जामनेर पोलीसांकडे शरणागती.

  • पाचोरा बसस्थानक गोळीबारातील जखमी आकाश मोरेचा जागीच मृत्यू.

  • पाचोरा बसस्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार, एक गंभीर जखमी.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्कूलबस व दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार गंभीर जखमी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›हातात नाही पैसा,कर देणार तरी कसा,.करमाफी करून,जनतेला दिलासा द्यावा~ अमोल शिंदे.

हातात नाही पैसा,कर देणार तरी कसा,.करमाफी करून,जनतेला दिलासा द्यावा~ अमोल शिंदे.

By Satyajeet News
October 4, 2021
721
0
Share:
Post Views: 53
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४-१०/२०२१

कोरोना (कोविड-१९) च्या संसर्ग काळामध्ये उद्भवलेल्या भयावह परिस्थितीत संसर्ग टाळण्यासाठी दिनांक २२ मार्च पासून संपूर्ण पाचोरा शहरात लॉकडाऊन करण्यात आले होते. येथील व्यापारी,उद्योजक, मजूर,दुकानदार व जनतेने लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोर पालन केले असल्याने कोरोना बाधितांची संख्या रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.

मात्र या लॉकडाऊनचा फार मोठा विपरीत परिणाम सामान्यांच्या जीवनावर झालेला आहे. विशेषतः सुमारे ३ महिन्यांपासून व्यापार,उद्योग,व्यवसाय व दुकाने बंद असल्यामुळे समाजातील अर्थचक्र पूर्णपणे थांबले आहे. या परिस्थितीचा खूप मोठा फटका पाचोरा बाजापेठेला बसला असून शहरातील नोकरदार,व्यावसायिक,मजूर चाकरमाने व लहान मोठे विक्रेते,फेरीवाले प्रभावीत झाले आहेत.अर्थातच सर्व घटकांचे अर्थकारण मोडकळीस आलेले आहे.

या आर्थिक संवेदनशील काळात जनतेला दिलासा देण्यासाठी आपण पाचोरा नगरपरिषद कार्यक्षेत्रात विविध मालमत्ता कर,गाळे भाडे, विविध कर, उपकर व आकार माफ करून दिलासा द्यावा अशी मागणी नगरपालिका मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना निवेदनाद्वारे भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केली आहे.

या निवेदनातील विशेष बाब म्हणजे या निवेदनाला पाठींबा दर्शवण्यासाठी शहरातील व्यापारी,नोकरदार,मजूर या सर्व क्षेत्रातील जवळपास ५००० पेक्षा जास्त जनतेने स्वाक्षऱ्या करून पाठिंबा दर्शविला आहे.निवेदनातील सविस्तर मागण्या खालील प्रमाणे

१) शहरातील न.पा.मालकीच्या व्यापारी संकुलातील सर्व गाळेधारकांचे ६ महिन्यांचे भाडे व त्यावरील मालमत्ता कर माफ करण्यात यावा.
२) लॉकडाउन काळात प्रभावित झालेल्या पाचोरा न.पा. क्षेत्रातील सरसकट सर्व निवासी मालमत्ता धारकांची घरपट्टी,मालमत्ता कर, पाणीपट्टी व इतर कर ५०% माफ करण्यात यावे.
३) पाचोरा न.पा.क्षेत्रातील खाजगी व्यापारी संकुले अथवा खाजगी गाळेधारक व्यावसायिकांचा ६ महिन्याचा मालमत्ता कर माफ करण्यात यावा.
४) पाचोरा न.पा.आठवडे बाजार शुल्क, फेरीवाले,टपरीमालक यांच्या कडील दैनंदिन पावती स्वरूपात वसूल करण्यात येणारा कर (डेली कमिटी) व अन्य सर्व कर वर्षभरासाठी १००% माफ करावे.
५) पाचोरा न.पा.क्षेत्रातील सर्व व्यवसायिक मालमत्ता धारकांचे ६ महिन्यांचे मालमत्ता कर,पाणीपट्टी आकार व इतर कर,उपकर माफ करण्यात यावेत.

निवेदनातील वरील सर्व मागण्या तातडीने मंजूर करून जनतेला दिलासा द्यावा.अशी आग्रही मागणी अमोल शिंदे यांनी सर्व भाजपा नगरसेवक यांच्या समवेत केली.यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील,कृ.उ. बा. समिती सभापती सतिष शिंदे,भाजपा शहराध्यक्ष रमेश वाणी,सरचिटणीस दिपक माने, राजेश संचेती,युवमोर्चा अध्यक्ष समाधान मुळे,आदी उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

देव बनण्यापेक्षा देवाचा मित्र बना – महामंडलेश्वर ...

Next Article

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगावशासकीय योजना

    पाचोरा विधानसभा मतदारसंघाचा छायाचित्र मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर पात्र मतदारांनी लाभ घेण्याचे आवाहन (प्रांताधिकारी राजेंद्रजी कचरे)

    November 18, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    अंबे वडगाव येथे अॅड.मंगेश गायकवाड यांचा सत्कार संपन्न.

    December 6, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    डॉ.संतोष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तकांचे वाटप.

    June 26, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    झोपेचे सोंग घेतलेल्या पाचोरा नगरपालिका प्रशासनाने आदर्श घ्यावा असा- आर्यन ग्रुपच्या तरुणांचा अभिनव उपक्रम.

    June 5, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    परराज्यातील फेरीवाल्यांची खेडेगावातील भटकंती संशयास्पद.

    February 27, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोऱ्यात रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा सैनिकाच्या पत्नीचा २२ हजार रुपये किंमतीचा मोबाईल केला परत.

    October 1, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी गोवंश हत्या करुन मांंस विक्री करणारांना रंगेहाथ पकडले.

  • पाचोरा तालुका.

    कोल्हे धरणातून दिवसाढवळ्या पाणी चोरी, कारवाईची मागणी.

  • क्राईम जगत

    लोहारा येथे घरात शिरून राका कुटुंबीयांना मारहाण. पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल.

दिनदर्शिका

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज