प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता संघटन मेळावा संपन्न
पाचोरा भडगाव येथील कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा समन्वय पक्षाला उभारी देणारा — खासदार उन्मेश दादा पाटील यांचे प्रतिपादन
————————–
दिलीप जैन. ( पाचोरा )
भारतीय जनता पार्टी पाचोरा- भडगाव यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता संघटन मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.यावेळी विभागीय संघटन मंत्री रविजी अनाजपुरे,क्षेत्र राज्य संपर्क प्रमुख किशोरजी काळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यास पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी,बुथ प्रमुख व कार्यकर्ते यांची मोठी उपस्थिती होती.यावेळी जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेशदादा पाटील यांनी सांगितले पाचोरा भडगाव येथील कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा पदाधिकारी यांच्यातला समन्वय पक्षाला उभारी देणारा असून भविष्यात पाचोरा तालुका भाजपचा हक्काचा मतदारसंघ होईल. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे,भडगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील,जेष्ठ कार्यकर्ते डॉ.विजय धांडे जळगाव लोकसभा विस्तारक सचिन पान-पाटील,शहराध्यक्ष रमेश वाणी , ज्येष्ठ नेते सतीश बापू शिंदे, सदाशिव आबा पाटील, जीप सदस्य मधुकर काटे, जिल्हा व्यापारी आघाडीचे कांतीलाल संचेती आदी मान्यवरांनी संघटन बैठकीसाठी परिश्रम घेतले.पाचोरा भडगाव येथील कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा समन्वय पक्षाला उभारी देणारा — खासदार उन्मेश दादा पाटील यांचे प्रतिपादन
————————–