सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›ग्रामीण पत्रकारांच्या करुण सत्यकथा.पत्रकार मा.श्री.डी. एस.डोने यांच्या लेखणीतून.

ग्रामीण पत्रकारांच्या करुण सत्यकथा.पत्रकार मा.श्री.डी. एस.डोने यांच्या लेखणीतून.

By Satyajeet News
November 19, 2021
168
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/११/२०२१

पुढे इचलकरंजीच्या पत्रकाराने डी एस डोने यांनी ग्रामीण
पत्रकारांच्या नेमक्या अडचणी अतिशय सहजतेने मांडल्या
आहेत.त्यांचा लेख मन अस्वस्थ करून सोडतो. जनतेला ह्या अडचणींची जाणीव व्हावी म्हणुन हि पोस्ट मी पुन्हा शेअर करीत आहे.

*होय, ग्रामीण पत्रकार उध्वस्त होत आहेत, त्यांची ही अवस्था पाहुन वेदना होतात,वाईट वाटते*… –

ग्रामीण पत्रकारांवर कशाप्रकारे अन्याय होतोय हे मला आजही सविस्तरपणे मांडायचे आहे, आणि ग्रामीण पत्रकारीता कशी संकटात सापडली आहे, कशी उद्धवस्त होत चालली आहे, हे सुद्धा निस्वार्थपणे सर्वांसमोर आणायचे आहे. मुख्यालय किंवा जिल्हा कार्यालय असलेल्या शहरातील पत्रकारांना जरी पगार मिळत असला तरी त्यांनाही योग्य तो मोबदला आणि न्याय मिळणे गरजेचे आहे, शहरातील पत्रकारांचे आणि ग्रामीण पत्रकारांचे शासन दरबारी पत्रकार म्हणून नोंद करण्यासारखे काही मुद्दे सारखे असले तरी ग्रामीण पत्रकारांचे बहुतांश प्रश्न शहरातील पत्रकारांपेक्षा भिन्न आहेत, आज मी स्वतंत्रपणे ग्रामीण पत्रकारांची व्यथा मांडणार आहे. ग्रामीण पत्रकार नेमक्या कोणत्या परिस्थितीत जगत आहेत ? त्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते ? एकुणच ग्रामीण पत्रकारीता कशी धोक्यात आली आहे ? आणि वाईट वाटण्याचे नेमके कारण काय ? हे खालील मुद्दे वाचून सर्वांच्या लक्षात नक्कीच येईल.

– महाराष्ट्रात जवळपास ८० टक्के ग्रामीण पत्रकार आहेत (अंदाजे २० हजार) हे सर्व बिनपगारी आहेत त्याचे वाईट वाटते.
————————————-
– वर्षानुवर्षे ग्रामीण पत्रकार फुकटात काम करतात आणि वर्तमानपत्रही ग्रामीण पत्रकारांनी फुकटात काम करावे ही मानसिकता ठेवतात, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– आर्थिक स्थिती चांगली असणारे वर्तमानपत्र सुध्दा वर्षानुवर्षे ग्रामीण पत्रकारांना एक रूपयाही पगार देत नाहीत, युज अ‍ॅण्ड थ्रो ची निती वापरतात, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– जाहीरातीसाठी ग्रामीण पत्रकारांवर कार्यालयाकडून दबाव आणला जातो, अपमानास्पद शब्दात बोलले जाते, टार्गेट पूर्ण केले नाही तर ग्रामीण पत्रकारांना वर्तमानपत्रातून काढून टाकण्याची भाषा वापरली जाते, हुकुमशाही लादली जाते, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– लाचार होवून जाहीराती गोळा कराव्या लागतात आणि कार्यालयास पाठवाव्या लागतात, एवढंच नव्हे तर जाहीरातदारांनी पैसे दिले नाही तर ग्रामीण पत्रकारांना स्वतःच्या खिशातले पैसे कार्यालयात भरावे लागतात, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– स्वतःच्या लेखणीची ताकद न ओळखता ग्रामीण पत्रकार दुसरा चांगला वर्तमानपत्र मिळेल का या विवंचनेत वर्तमानपत्र सोडत नाही, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– अनेक वर्तमानपत्र ग्रामीण पत्रकारांना गुलामासारखी वागणूक देतात तरीही ग्रामीण पत्रकारांचा स्वाभिमान जागा होत नाही, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– ग्रामीण पत्रकार आजारी पडल्यास मदत तर सोडाच साधी विचारपूस सुध्दा वर्तमानपत्र करत नाहीत, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– जाहीरातीसाठी अनेक बैठका घेणारे वर्तमानपत्र पत्रकारांच्या कल्याणासाठी एक बैठक सुध्दा कधीच घेत नाहीत, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– वर्तमानपत्राकडून मदत तर सोडाच, कुटूंबाचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून एखाद्या छोट्याशा व्यवसायासाठी साधं मार्गदर्शन सुध्दा वर्तमानपत्र करत नाहीत, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– मोलमजूरी करणाऱ्या बांधवांना दिवसाला किंवा आठवड्याला किंवा महिन्याला काही पैसे तरी मिळतात मात्र ग्रामीण पत्रकारांना वर्षानुवर्षे पत्रकारीता करूनही कधीच एक पैसाही मोबदला म्हणून मिळत नाही, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– वर्तमानपत्रांना उत्पन्नाचे स्त्रोत हे जाहीरातच आहे हे जरी खरे असले तरी त्या जाहीराती ग्रामीण पत्रकारांनीच द्याव्यात ही सक्ती केली जाते, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– स्वतंत्र जाहीरात प्रतिनिधी नेमुन त्यांच्याकडून जाहीरात मिळवणे सहज शक्य असतांना ग्रामीण पत्रकारांना वेठीस धरले जाते, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– समाजहितासाठी (खरोखर) लढणारे वर्तमानपत्र जगले पाहीजे आणि ग्रामीण पत्रकारांनाही न्याय मिळाला पाहीजे अशी व्यवस्था निर्माण होतांना दिसत नाही, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– ज्या वर्तमानपत्रांची आर्थिक स्थिती ठिक नाही त्यांना दोष देत नाही, परंतु ज्यांची जाहीरातीतून कोट्यावधी रूपयांची उलाढाल होते, ते सुध्दा एक रूपयाही ग्रामीण पत्रकारांना देत नाहीत, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– जेव्हा एखादा वर्तमानपत्र बैठक घेवून ग्रामीण पत्रकारांना वाट्टेल ते करा, जाहीरातदारांना वाट्टेल ते बोला पण जाहीरातीचे टार्गेट पूर्ण करा असे सांगतो, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– एखादा वर्तमानपत्र सरळ सरळ धंदा सुरू करतो, पाठवलेल्या बातमीचं रिटर्न काय हे विचारतो, पेड न्युजचा बाजार मांडतो आणि या मानसिकतेचा पाहीजे तसा विरोध होतांना दिसत नाही, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– ग्रामीण पत्रकारांकडून वर्षानुवर्षे गुलामासारखे काम करून घेणाऱ्या बहुतांश वर्तमानपत्रांना आपल्याच ग्रामीण पत्रकाराच्या गावाचा रस्ता सुध्दा माहित नाही, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– जेव्हा एखादा वर्तमानपत्र ग्रामीण पत्रकारांकडून गॅरंटी म्हणून ( इतर कागदपत्रांसह) कोरा बाँड किंवा कोरा चेक सही करून घेतो, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– गॅरंटी घेणारे वर्तमानपत्र ग्रामीण पत्रकारांना चार ओळीचे नियुक्तीपत्र सुध्दा देत नाहीत, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– ज्या जनतेच्या न्याय हक्कासाठी ग्रामीण पत्रकार हा सर्व अन्याय सहन करतो ती जनता किंवा तो समाज केव्हाच पाठीशी उभा राहत नाही, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– एखादा पत्रकार चुकीचा असेलही मात्र समस्त पत्रकारांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून पत्रकार पैसे घेत असतील असा अंदाज जेव्हा समाजाकडून बांधला जातो, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– आयुष्याची अनेक वर्षे पत्रकारीता करूनही शासन दरबारी ग्रामीण पत्रकारांची “पत्रकार” म्हणून नोंद सुध्दा नाही, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– शासन दरबारी अधिकृत नोंद नसल्याने ग्रामीण पत्रकारांना कुठल्याही कायद्याचा किंवा योजनेचा फायदा सहज मिळेल अशी शक्यता नाही, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– ग्रामीण पत्रकारांना कुटूंबाच्या पालन पोषणासाठी किंवा मुला-मुलीच्या शिक्षणासाठी किंवा आरोग्यासाठी कुठलीच मदत मिळत नाही, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– उत्पन्नाचं साधन किंवा कुठलीही मदत नसल्याने मुलीच्या लग्नासाठीही ग्रामीण पत्रकारांना जी तारेवरची कसरत करावी लागते किंवा कर्जबाजारी व्हावे लागते, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– ग्रामीण पत्रकारांवर हल्ले होतात, धमक्या दिल्या जातात, मारहाण होते मात्र स्थानिक मदत मिळत नाही, इतर वर्तमानपत्र शक्यतो चार ओळीची बातमी सुध्दा छापत नाहीत, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– जेव्हा ग्रामीण पत्रकाराचा मुलगा किंवा मुलगी हजार पाचशे रूपयाची वस्तु पप्पा मला पाहीजे म्हणून सांगते आणि हा ग्रामीण पत्रकार बेटा नंतर घेवू म्हणून तिला परत पाठवतो, त्या पत्रकाराची हतबलता पाहुन वाईट वाटते.
————————————-
– ग्रामीण महाराष्ट्र जगासमोर आणणारे आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या न्याय हक्कासाठी सतत लढा देणारे ग्रामीण पत्रकार स्वतःच अन्यायाचे बळी ठरत आहेत, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– ग्रामीण जनतेच्या जीवनाशी निगडीत प्रत्येक समस्या आपल्या लेखनीच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणारे ग्रामीण पत्रकार स्वतःच समस्यांच्या चक्रव्युहात फसले आहेत, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– ग्रामीण जनतेच्या सुरक्षेची काळजी करणारे ग्रामीण पत्रकार स्वतःच असुरक्षिततेच्या छायेत जगत आहेत, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– अख्खं आयुष्य समाजहितासाठी संघर्ष करणाऱ्या ग्रामीण पत्रकारांना स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही न्याय मिळत नाही, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– एकीकडे सर्वसामान्य नागरीकांवर वेळोवेळी होत असलेला अन्याय आणि सामाजिक बांधिलकी पत्रकारीता सोडू देत नाही, तर दुसरीकडे कुठलीच मदत नसल्याने ग्रामीण पत्रकार उद्धवस्त होत चालले आहेत, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– असंख्य चांगल्या पत्रकारांनी अनेक वर्षे पत्रकारीता करून नाईलाजाने पत्रकारीता सोडून दिली आहे आणि सोडत आहेत अर्थात ही धोक्याची घंटा आहे हे कोणाच्या लक्षात येऊ नये याचे वाईट वाटते.
————————————-
– अशाच प्रकारे येणाऱ्या काळात चांगले ग्रामीण पत्रकार बाहेर पडत राहील्यास ग्रामीण जनतेला न्याय हक्क मिळवून देणार कोण ? त्याचे वाईट वाटते.
————————————-
– पत्रकारांकडून अपेक्षा ठेवणारा समाज पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी कधीच रस्त्यावर उतरत नाही, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– ग्रामीण जनतेच्या न्याय हक्कासाठी पेटून उठणारा ग्रामीण पत्रकार स्वतःच्या न्याय हक्कासाठी पेटून उठत नाही, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– पत्रकारांसाठी लढणाऱ्या प्रत्येक संघटनेची दिशा वेगळी, मार्ग वेगळे, कार्यपद्धती वेगळी आणि विचारही वेगळे दिसुन येतात, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– सर्व पत्रकार संघटना समस्त पत्रकारांचे हित लक्षात घेवून एकत्रीत बसून सामंजस्याने चर्चा करीत नाहीत, सामुहीक प्रयत्न करीत नाहीत, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– विधानसभा असो किंवा विधानपरिषद समस्त पत्रकारांच्या प्रश्नांवर अपवादानेच चर्चा केली जाते, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– पत्रकारांसाठी एखादा निर्णय झालाच तर त्याची अंमलबजावणी होतांना दिसत नाही, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– दुर्दैवाने विधानसभा अथवा विधानपरिषदेत ग्रामीण पत्रकारांच्या प्रश्नांवर स्वतंत्रपणे चर्चा करून निर्णय घेतले जात नाहीत, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– आयुष्यभर घर जाळून कोळशे करणाऱ्या असंख्य ग्रामीण पत्रकारांना आयुष्याच्या शेवटीही अडचणींचा सामना करावा लागतो, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– समाजाच्या न्याय हक्कासाठी स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करणारा एखादा पत्रकार न्यायाच्या प्रतिक्षेत जगाचा निरोप घेतो, त्याचे वाईट वाटते.
————————————-
– ग्रामीण पत्रकार आयुष्यभर सर्वांसाठी संघर्ष करत जगतात आणि संघर्ष करत मरतात मात्र तरीही वर्तमानपत्र, शासन किंवा समाज त्याची दखल घेत नाही, त्याचे वाईट वाटते.

धन्यवाद…
—————————————-

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 54
Previous Article

कुसुंब्याहून दिगंबर जैन मुनिश्री यांचा २३ ला ...

Next Article

शेतकऱ्यांचा विरोध असलेले ते तिन्ही कृषी कायदे ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedराष्ट्रीय

    पाचोऱ्यात शिवसेना व काँग्रेसतर्फे एकदिवशीय धरणे आंदोलन.

    December 4, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    शिवरायांच्या सन्मानार्थ असे हजारो गुन्हे स्वतःवर घेण्यास तयार- अमोल शिंदे.

    February 20, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    जामनेर, पाचोरा रस्त्यावर भरला गुरांचा बाजार, वरखेडी लोहारी दरम्यान वाहतूक खोळंबली.

    July 15, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    २८ डिसेंबर रोजी पत्रकार संघाचे ठाणे येथे राज्यस्तरीय १६ वे अधिवेशन.

    December 26, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    अंबे वडगाव येथे माकडाच्या हल्ल्यात ४२ वर्षीय इसम जबर जखमी, वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा कानाडोळा.

    February 13, 2023
    By Satyajeet News
  • Uncategorized

    जंगली श्वापदाच्या हल्ल्यात शेळ्या ठार, पशुधन पालकांमध्ये भीतीचे वातावरण.

    December 26, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    पाचोर्यात शेतकऱ्यांचे लाक्षणिक जेल भरो आंदोलन : बच्चू कडू यांच्या आंदोलनाला समर्थन.

  • ब्रेकिंग न्यूज

    परमेश्वराने दिल परंतु दुश्मनाने हिरावले, तारखेडा येथील मक्याच्या कणसाचा ढिगारा अज्ञाताने पेटवला.

  • ब्रेकिंग न्यूज

    खडकदेवळा खुर्द येथे विषबाधा होऊन सहा म्हशी व एक रेड्याचा मृत्यू, शेतकऱ्याचे अंदाजे सात लाख रुपयांचे नुकसान.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज