गाव तस चांगल पण राजकारणान भंगल परधाडे ग्रामपंचायत निकालानंतर हाणामारी ; दोन्ही गटांच्या एकमेकांविरोधात फिर्यादी.
माजी सभापतीसह ११ जणांविरुद्ध अॅट्रासिटीचा ; दुसऱ्या गटातील १५ जणांविरुद्ध लुटमारीचा गुन्हा
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०१/२०२१
पंचायत समिती माजी सभापतीसह ११ जणांविरुद्ध पाचोरा पोलिसात अॅट्रासिटी व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने आणि दुसरीकडे माजी सभापतीच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून १५ जणांविरुद्ध लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परधाडे येथील रहिवाशी व पंचायत समितीचे माजी सभापती बन्सीलाल पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत पत्नी कविता पाटील यांचेसह ७ उमेदवार उभे केले होते. निकालात त्यांचे सर्व उमेदवार पराभुत झाले कविता पाटील यांचे विरोधात उभ्या असलेल्या उषाबाई पाटील निवडुन आल्यावर त्या नागरिकांचे आभार मानत असल्याचा राग आल्याने बन्सीलाल पाटील यांनी राहुल सोनवणे, सोपान सोनवणे, रविंद्र सोनवणे, विकास सोनवणे यांचेसह इतरांना लाठ्या काठ्यांनी मारहाण, जातीवाचक शिविगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याने राहुल सोनवणे यांच्या फिर्यादीवरून बन्सीलाल पाटील, मुकेश पाटील, शुभम पाटील, अविनाश पाटील, मनोज पाटील, योगेश पाटील, कविता पाटील, संगिता पाटील, सखुबाई महाजन, सुभाष पाटील, लक्ष्मीबाई महाजन ( सर्व रा.- परधाडे ता. पाचोरा ) यांचेविरुद्ध अॅट्रासिटी व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा पाचोरा पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला
तपास पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे हे करीत आहे.
कविता पाटील (वय – ३६) यांनी प्रतिस्पर्धी गटाविरुद्ध दिलेल्या फिर्यादीत की ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी उमेदवारांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गावात गुलाल उधळत मिरवणुक काढली होती. मिरवणुकीत वापरण्यात येणारा गुलाल आमच्या घरात का फेकता याचा जाब विचारला असता त्याचा राग येवुन त्यांनी कानातील ७ ग्रॅम वजनाची सोन्याच्या बाळ्या जबरीने ओढत मला मारहाण केली. संगिता पाटील यांच्या गळ्यतील १८ ग्रॅमची सोन्याची चैन चोरुन नेत मारहाण केली. जिल्हा दंडाधिकारी यांचे जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याने भैय्या सोनवणे, प्रशांत पाटील, परमवीर पाटील, विकास सोनवणे, अशोक पाटील, सोपान सोनवणे, आकाश सोनवणे, आनंदा सोनवणे, पृथ्वीराज सोनवणे, सविता सोनवणे, आरती सोनवणे, योगिता सोनवणे, रुपाली सोनवणे, सुमित्रा सोनवणे, योगिता सोनवणे यांची सासु (नाव माहित नाही) ( सर्व रा. परधाडे ता. पाचोरा ) या १५ जणांविरुद्ध लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील व पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे हे करीत आहेत .