सार्वे, जामने ग्रामपंचायतीवर धनशक्ती विरुध्द जनशक्तीचा विजय. सरपंच पदी श्रीमती भागाबाई दुधे तर उपसरपंच पदी श्री. गजानन पाटील.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०२/२०२१
पाचोरा तालुक्यातील सार्वे, जामने ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक दिनांक १३ फेब्रुवारी शनिवारी पिठासन अधिकारी श्री. प्रकाश डहाके. ग्रामसेवक श्री. विकास पाटील यांच्या उपस्थितीत शांततेत पार पडली.
या निवडणुकीत सार्वे, जामने या ग्रुप ग्रामपंचायतीवर धनशक्तीच्या जोरावर सतत पंधरा वर्षे राज्य करणारे शांताराम सोनजी पाटील. यांच्या सत्तेला जनशक्तीने झुगारून ग्रामविकासासाठी सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा म्हणून सरपंच पदावर श्रीमती भागाबाई बळीराम दुधे (पाटील) व उपसरपंचपदी श्री. गजानन भानुदास पाटील. यांची एकमताने निवड करुन एक नवा आदर्श घडवून आणला. विशेष म्हणजे शांताराम सोनजी पाटील. यांचे तिन सदस बिनविरोध निवडून आलेले होते. परंतु नवनियुक्त सदस्य सौ.कल्पनाताई धनराज पाटील, सौ.अर्चनाताई ज्ञानेश्वर तिरमल व श्रीमती वत्सलाबाई उखर्डु भिल हे कोणत्याही आमीशाला बळी न पडता त्यांनी ग्रामस्थांच्या भावनेचा आदर करत जनशक्तीच्या बाजूने कौल दिला. म्हणून ही निवडणूक धनशक्ती विरुध्द जनशक्तीचा विजय झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले
या प्रसंगी भानुदास पाटील, फकीर पाटील, अशोक पाटील, धनराज पाटील, राजू पाटील, भागवत पाटील, समाधान शिंदे, राजाराम निकुंभ, लक्ष्मण पाटील, जगन्नाथ पुनवते, प्रकाश दुधे, राजु बोरसे, ईश्वर बोरसे, ज्ञानेश्वर कोळी, संदिप निकुंभ, भास्कर थाटे,डॉ. युवराज पाटील, किसन पोसने, वाल्मिक निकुंभ, विजय पाटील, श्रीकृष्ण पोसने, अजय निकुंभ, हेमराज पाटील, मल्हारु दुधे, दिपक बोरसे, अजय निकुंभ, मोहन पोसने, महादु दोडके, संजय निकुंभ, नाना पाटील, माणीक थाटे, परविन थाटे, भागवत आहिरे, गजानन पवन पोसने, सौ. शोभाबाई पाटील, सौ.मंगलाबाई पाटील, पो.पा.सौ.जोतीबाई पाटील, रामकृष्ण पुणवते, पांडुरंग पुणवते, सौ.मंगलाबाई पाटील, सौ.ताराबाई पाटील बहुसंख्य ग्रामस्थ व महिला हजर होत्या
कायदा सुव्यवस्था कामी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे पो.हे.का.आर.के.पाटील. जामने येथील पोलीस पाटील सौ.ज्योती समाधान पाटील. सार्वेचे पोलीस पाटील। रामकृष्ण बाबुराव पाटील