पाचोरा कॉंग्रेसचा अभिनव उपक्रम, कॉग्रेस आपल्या दारी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०८/२०२१
पाचोरा तालुका कॉंग्रेसने पक्षातर्फे कॉग्रेस आपल्या दारी या अभिनव उपक्रमाला ग्रामीण भागातून सुरुवात केली असून या उपक्रमाला जनतेतून उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळत आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा काॅग्रेसने कॉंग्रेस आपल्या दारी असा उपक्रम सुरू केला असून या उपक्रमाची सुरुवात व पहीला दौरा बाळद बुद्रुक येथुन करण्यात आला.
या उपक्रमात ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या जाणून घेत, घराघरात शासकीय योजनांची माहिती देणे, संघटन मजबूत करण्यासाठी कॉग्रेस पक्षात प्रवेश देऊन युवक, युवतींना सक्रिय करत नवीन समित्या गठीत करुन विविध योजना व समाजपयोगी उपक्रम राबवणे, सुशिक्षित बेरोजगारांना, तरुणांना महत्वपूर्ण माहिती देणे व अडीअडचणी सोडवणे याकरिता प्रयत्न केले जाणार आहेत.
या उपक्रमानिमित्ताने पाचोरा तालुक्याचे अध्यक्ष व पदाधिकारी हे बाळद बुद्रुक गावात गेले असता युवाशक्ती ने मान्यवरांची सवाद्य मिरवणूक काढून स्वागत केले.
नंतर सचिन सोमवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. या सभेत सचिन सोमवंशी यांनी कॉंग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी भर देत नाना पाटोले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात काँग्रेस आगेकूच करत असून महाराष्ट्राच्या विकासात काँग्रसचा सिंहाचा वाटा आहे. म्हणून जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होवुन शासनाच्या योजना कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी झटले पाहिजे असे सांगितले.
तसेच पाचोरा तालुक्यात सहा मोठी धरण आणि असंख्य लघु धरणे कॉंग्रेसनेच केली आहेत. असा विकास सात जन्मात कोणतेही सरकार करु शकत नाही. हे जनतेला सांगितले पाहिजे. कॉंग्रेस पक्षाचे पाचोरा तालुक्यावर माजी मंत्री स्व.के. एम.बापु पाटील यांच्या माध्यमातून केलेल्या विकास हा न विसरण्यासारखा आहे. असे सांगत काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांचा लेखाजोखा कार्यकर्त्यासमोर ठेवला.
नंतर तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, भाऊराव पाटील यांच्या समयोचित भाषणे झाली. यावेळी प्रदीप ठाकरे, सुनील बिर्हाडे, गणेश वाघ, समिर ठाकरे,योगश सोनवणे, गोकुळ सोनवणे, करण सोनवणे, दिपक ठाकरे, विजय माळी, सईद बेग अमोल सोनवणे, गुलफाम शेख ,कासम पिंजारी, सागर सोनवणे,शाहरुख पठाण, आसिफ शेख, आदीसह शेकडो युवकांनी कॉंग्रेस मध्ये प्रवेश घेतला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, भाऊराव पाटील, आदी उपस्थित होते.