सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • अनफिट, नादुरुस्त स्कूलबसमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, प्रादेशिक महामंडळाकडून कारवाई अपेक्षित.

  • कायद्याची राहिली नाही भीती, गोळीबार करणाऱ्या आरोपींची जामनेर पोलीसांकडे शरणागती.

  • पाचोरा बसस्थानक गोळीबारातील जखमी आकाश मोरेचा जागीच मृत्यू.

  • पाचोरा बसस्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार, एक गंभीर जखमी.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्कूलबस व दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार गंभीर जखमी.

राजकीय
Home›राजकीय›नशिराबादचा पहिला नगराध्यक्ष शिवसेनेचाच ना.गुलाबराव पाटील,महिनाअखेर होणार नगरपालिका; भगवा फडकावण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन.

नशिराबादचा पहिला नगराध्यक्ष शिवसेनेचाच ना.गुलाबराव पाटील,महिनाअखेर होणार नगरपालिका; भगवा फडकावण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन.

By Satyajeet News
June 28, 2021
569
0
Share:
Post Views: 154
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०६/२०२१

जळगाव येथून जवळच असलेल्या नशिराबाद येथील नगरपालिकेचे नोटिफिकेशन या महिन्याच्या अखेरीस निघणार असून येथील पहिला नगराध्यक्ष हा शिवसेनेचाच असणार आहे. कार्यकर्त्यांनी सुक्ष्म नियोजनासह एकदिलाने प्रयत्न करून भगवा फडकावण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. युवक हे परिवर्तनातील सर्वात महत्वाची भूमिका निभावणार असून त्यांनी आगामी निवडणुकीत सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन केले. ते नशिराबाद येथे युवासेना व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत बोलत होते.

नशिराबाद नगरपालिकेची प्रक्रिया अंतीम टप्प्यात आली असून या अनुषंगाने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी येथे युवासेना व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. यात ते म्हणाले की, जिल्हा परिषदेकडचा रिपोर्ट हा बाकी असून आपण स्वत: हा अहवाल उद्या मंत्रालयात घेऊन जात आहोत. यामुळे या महिन्याच्या अखेरीस नशिराबादला नगरपालिका होणार असल्याचे निश्चितच आहे. या आगामी निवडणुकीला सामोरे जातांना शिवसैनिकांनी सुक्ष्म नियोजनाला महत्व देण्याची गरज आहे. वेळप्रसंगी गनीमी काव्याचा वापरू करून आपण निवडणुकीत यश संपादन करण्याचे पूर्ण प्रयत्न करावेत. यासाठी युवा सेवा व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदस्य नोंदणीला प्राधान्य द्यावे. निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी सुक्ष्म नियोजन हा घटक सर्वात महत्वाचा आहे. याच्या मदतीने आपण निश्चितच निवडणुकीत बाजी मारणार आहोत.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, नशिराबाद येथे मुस्लीम मतदारसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. या समुदायाचा शिवसेनेबाबतचा दृष्टीकोन अलीकडच्या काळात बदललेला आहे. आता लोक जात व धर्माच्या पलीकडे विकासाला प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण हे धरणगाव येथील आहे. तेथे ७० टक्के हिंदू तर ३० टक्के मुस्लीम समाज असतांनाही सलीम पटेल यांच्यासारख्या शिवसैनिकाला लोकांनी निवडून दिले ते त्यांच्या विकासाच्या व्हिजनवरच ! यामुळे नशिराबादमध्येही विकासाच्या बळावरच आपण विजय संपादन करणार असल्याचा आशावाद ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी युवक हे आगामी निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावू शकतात असे नमूद केले. ते म्हणाले की, निवडणुक प्रक्रियेत युवक हे परिवर्तनाचे काम करत असतात. प्रत्येकाने आपला व्यवसाय व रोजी-रोटी सांभाळून राजकारणात सक्रीय व्हावे. आगामी निवडणुकीत तरूणाईच्या बळावर शिवसेना विजय संपादन करणार असल्याचा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आधीच्या नशिराबाद ग्रामपंचायतीतील गैरव्यवहाराच्या अनेक तक्रारी ग्रामस्थानी केल्या असून याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून याची योग्य ती चौकशी होणार असल्याची महत्वाची घोषणा देखील ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली.

याप्रसंगी जिल्हा प्रमुख तथा जळगांव मनपा चे माजी महापौर विष्णुभाऊ भंगाळे यांनी युवासेना व शिवसेना व महिला आघाडी चे मजबूत संघटन बांधणी बाबत कानमंत्र दिला तर युवासेनेचे जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंडू खंडारेसर यांनी केले. प्रास्ताविक शहर प्रमुख विकास धनगर यांनी केले तर आभार युवासेनेचे चेतन बऱ्हाटे यांनी मानले.

याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णूभाऊ भगाळे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, तालुका प्रमुख राजु चव्हाण, शहरप्रमुख विकास धनगर,युवासेना शहरप्रमुख चेतन बऱ्हाटे, संगायो सदस्य चंदु भोळे, कैलास नेरकर, संघटक आबा माळी, नितीन बेंडवाल, नितीन भोई, मोहन कोलते, दिपक बोंडे, महेंद्र कोळी, विशाल सोनवणे, मयुर झटके, दिपक सपकाळे, संजय देशमुख, सोहन पाटील,सोपान कोळी, राज बेंडवाल, मनोज नाथ, दर्शन झटके, प्रकाश कनगरे, दिनेश सावळे, निलेश धनगर, सर्व युवासैनिक व शिवसैनिक यांची ऊपस्थिती होती.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

सावखेडा ते भोजे रस्त्यावर जीवघेणा खड्डा, अपघाताची ...

Next Article

लोहारा येथील तलाठी शेख यांची करामत,जिवंत शेतकऱ्याला ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • राजकीय

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगरदेवळा शहर नवनियुक्त कार्यकारणी जाहीर.

    September 12, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    आमदार आपल्या दारी!किशोर आप्पांचा स्तुत्य उपक्रम!! आमदार असावा तर असा (शिवराम पाटील.)

    June 24, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    पाचोरा नगरपरिषदेतर्फे विविध विकास कामांचे लोकार्पण व भुमिपुजन सोहळ्यासाठी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.एकनाथ शिंदे पाचोरा नगरीत.

    July 10, 2021
    By Satyajeet News
  • मनोरंजनमहाराष्ट्रराजकीयराष्ट्रीयशासकीय योजनासंपादकीयसांस्कृतिक

    आत्मनिर्भर भारत’ हे नरेंद्र मोदींचे महत्त्वाचे पाऊल , आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केले कौतुक

    September 28, 2020
    By Satyajeet News
  • राजकीय

    नगरदेवळा ग्रामपंचायतीसाठी ६७% मतदान.

    January 15, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    माजी आमदार श्री. दिलीप भाऊ वाघ. कोरोनावर मात करून स्वगृही परतले.

    March 1, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    कुऱ्हाड येथील भंगाराच्या व्यापाऱ्यांचा, टांगा पलटी घोडे फरार झाल्याची चर्चा.

  • आपलं जळगाव

    शेंदुर्णी येथील गरुड महाविद्यालयात वृक्ष दत्तक योजनेची उत्साहात सुरुवात.

  • क्राईम जगत

    कुऱ्हाड गावात भोंदूबाबा दररोज करतोय पन्नास हजाराची कमाई. मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ?

दिनदर्शिका

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज