आमदार मंगेशजी चव्हाण यांची महावितरण अधिक्षक अभियंत्यास समर्थकांसह धक्काबुक्की.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०३/२०२१
जळगाव : चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या समर्थकांसह महावितरण अधिक्षक अभियंत्यास धक्काबुक्की करण्यासह अंगावर धावून जाण्याचा प्रकार आज दुपारी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा भा.द.वि. ३५३, ३३२, १४३, १४७, १४९, ३५१, २९४, २६९, १८८, मुंबई पोलिस कायदा कलम १३५ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
महावितरण अधिक्षक अभियंता मोहम्मद फारुख मोहम्मद युसुफ शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आ. मंगेश चव्हाण व त्यांचे जवळपास पन्नास समर्थक त्यांना भेटण्यासाठी एमआयडीसी परिसरातील कार्यालयात आले होते. त्यावेळी एकेरी भाषेत बोलून हा धक्काबुक्कीसह अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला.
Download WordPress Themes Nulled and plugins.