जळगाव जिल्ह्यात २५ जूनपर्यंत ३७ (१) (३) कलम जारी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०६/२०२१
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात २५ जून, २०२१ पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) अप्पर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी जारी केले असून तसे आदेश निर्गमित केले आहे.
या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलीस स्टेशन कार्यालयाची पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. परंतु मा. जिल्हादंडाधिकारी जळगाव यांचेकडील आदेश क्र.दंडप्र-०१/कावि/२०२१/८४०, दि. ६ जून, २०२१ मधील अटी लागू राहतील.
आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी आदेशात म्हटले आहे.